महिलेचा विनयभंग करणाऱ्या सराईत आरोपीला 6 दिवसात सुनावणी पूर्ण करून सुनावली शिक्षा

0

मुंबई,दि.6 : महिलेची छेड काढत गुप्तांग दाखवून विनयभंग करणाऱ्या सराईत आरोपीला 6 दिवसात सुनावणी पूर्ण करून न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.

18 सप्टेंबर रोजी महर्षी कर्वे रोड येथे महिलेची छेड काढत असल्याचा मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला फोन आला. पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहचले आणि आरोपीला अटक केली. आरोपी राजकुमार नारायण तांडेलवर याआधीसुद्धा महिलांची छेड काढण्याचे 3 गुन्हे दाखल असून 2 गुन्ह्यात त्याला शिक्षा सुद्धा झाली असल्याचे पोलीसांच्या तपासात निष्पन्न झालं.

राजकुमार तांडेल सराईत गुन्हेगार असून त्याला तात्काळ शिक्षा होणे गरजेचं होतं. युध्दपातळीवर तपास करत 28 सप्टेंबरला न्यायालयात आरोपपत्र दाखल करत फक्त 6 दिवसांच्या सुनावनीत आरोपीला 3 वर्षांची सश्रम कारावास आणि 1 हजार रु दंड भरण्याची शिक्षा सुनावण्यात आली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here