अल्पवयीन मुलीचा विनयभंग, गावकऱ्यांनी आरोपी शिक्षकाला केली बेदम मारहाण

0

कोल्हापूर,दि.30: शिक्षकाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याने गावकऱ्यांनी आरोपी शिक्षकाला बेदम मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडीओ (Video) व्हायरल झाला आहे. शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना घडली आहे. कोल्हापुरात (Kolhapur) एका शिक्षकाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. पीडित मुलीने याबाबत आई वडिलांना माहिती दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे.

मुलीने आई वडिलांना या घटनेची माहिती दिल्यानंतर संतप्त पालकांसह गावकऱ्यांनी आरोपी शिक्षकाला चांगलंच झोडपून काढलं आहे. यावेळी घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या काहीजणांनी या घटनेचा व्हिडीओ आपल्या मोबाइलमध्ये शूट केला आहे. हा सध्या सोशल मीडियात वेगाने व्हायरल (Viral video) झाला असून नेटकरी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. संबंधित शिक्षकाला शाळेच्या बाईसह गावातील अनेकांनी लाथा-बुक्क्यांचा प्रसाद दिला आहे.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, एक काही गावकरी संशयित आरोपी शिक्षकाच्या पायाला धरून ओढत आहेत. तर काहीजण लाथा बुक्क्यांनी मारहाण करत आहेत. यावेळी शाळेतील बाईंनी देखील दप्तराच्या साह्याने आरोपी शिक्षकाला झोडपून काढलं आहे. छेडछाड आणि विनयभंगाचा प्रकार थेट शिक्षकाकडूनच घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संबंधित शिक्षकाच्या विरोधात अद्याप कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नसल्याची माहिती मिळत आहे. पण व्हिडीओ व्हायरल झाल्याने कोल्हापुरात खळबळ उडाली आहे.

ग्रामस्थांनी शिक्षकाला चोप देत असतानाचा व्हिडीओ शूट करण्यात आला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत अनेक जण शिक्षकाला अक्षरशः लाथा-बुक्क्यांनी मारताना दिसत आहेत. वर्गातच त्याला पायाखाली तुडवलं जात असल्याचं पाहायला मिळत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here