ACB ने पोलीस उपनिरीक्षकासह हवालदाराला लाच घेताना रंगेहाथ पकडले

बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत लाचेची मागणी

0

सिंधुदुर्ग,दि.21: ACB ने पोलीस उपनिरीक्षकासह हवालदाराला लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. ACB ने (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) सिंधुदुर्गात पोलीस उपनिरीक्षकासह हवालदाराला लाच (Bribe) घेताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई काल (20 एप्रिल) करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने सापळा रचत त्या दोघांना 20 हजार रुपयांची रोख रक्‍कम घेताना पकडले आहे. या कारवाईनंतर त्या दोघांच्या घरावर लाचलुचपतच्या पथकाने छापा टाकला असून त्यांच्या मालमत्तेसह कागदपत्रांची चौकशी सुरु आहे.

376 अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी

याप्रकरणी तक्रार देणाऱ्या तक्रारदाराला तुझ्याविरोधात कलम 376 अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करतो अशी धमकी पोलीस उपनिरीक्षक सुरज पाटील आणि हवालदार मारुती साखरे या दोघांनी दिली होती. तसंच तक्रारदाराकडे 40 हजार रुपयांची मागणी केली होती. त्यातील 20 हजार रुपये देण्याचे ठरले होते.

ACB ने पोलीस उपनिरीक्षकासह हवालदाराला लाच घेताना रंगेहाथ पकडले

त्यानुसार तक्रारदाराने सिंधुदुर्ग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार केली. दरम्यान ठरल्यानुसार लाचलुचपतच्या पथकाने या ठिकाणी सापळा रचला त्या दोघांना 20 हजार रुपयांची रोख रक्‍कम घेताना रंगेहाथ पकडले. लाच स्वीकारल्याप्रकरणी वैभववाडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सुरज पाटील आणि हवालदार मारुती साखरे या दोघांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

या प्रकरणी वैभववाडी पोलीस ठाण्यात (Vaibhavwadi Police Station) दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईनंतर त्या दोघांच्या घरावर लाचलुचपतच्या पथकाने छापा टाकला असून त्यांच्या मालमत्तेसह कागदपत्रांची चौकशी सुरु आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here