दि.6:अनेकांना ऑनलाईन खरेदी करण्याची सवय असते. बाजारातून वस्तू मिळत असताना,ती वस्तू स्वस्त मिळते म्हणून ऑनलाईन मागवली जाते. सध्या देशात फेस्टिव्ह सीजनची सुरूवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर ऑनलाइन साइट्सवर अनेक कंपन्यांनी मोठ्या ऑफर्स, डिस्काउंट्ससह आपले सेल जाहीर केले. अनेक ग्राहकही ऑनलाइन साइट्सचा वापर करुन, आपला वेळ आणि पैसे वाचवण्याचा प्रयत्न करतात. पण अनेक ग्राहकांना या ऑनलाइन खरेदीवेळी काही समस्याही येतात. असाच काहीसा प्रकार समोर आला आहे.
@RahulSi27583070 नावाच्या युजरने ऑनलाइन साइट फ्लिपकार्टवरुन खरेदी केल्यानंतर आलेला भयंकर अनुभव काही फोटोंसह शेअर केला आहे. त्यांनी 2000 mAh ची एक पॉवर बँक ऑर्डर केली होती. परंतु पॉवर बँकऐवजी त्यात एक विटेचा तुकडा आला.
Thanks @Flipkart @flipkartsupport for “brick piece” instead of 20000 mah power bank. Hatt off to #BigBillionDays #flipkart Order Id : OD123002100216739000 pic.twitter.com/zJiHv8bRP1
— Rahul Singh (@RahulSi27583070) October 4, 2021
हा प्रकार घडल्यानंतर युजरने ऑर्डर ID सह फ्लिपकार्डला टॅग करत एक पोस्ट लिहिली आहे. त्यात 2000 mAh ऐवजी विटेचा तुकडा पाठवल्याबद्दल धन्यवाद असं कॅप्शनही लिहिलं आहे. या व्यक्तीने आपली समस्या शेअर केल्यानंतर, इतरही अनेक युजर्सनी त्यांचे अनुभव सांगितले आहेत.
@ArvindM81516288 या युजरने फ्लिपकार्टवरुन लायटर ऑर्डर केलं होतं. पण त्यात एक मोठा खिळा आला. याचा व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे.
Flipkart
Flipkart Karta Hai main lighter man gaya usmein se aap Hi Dekho Kya nikala pic.twitter.com/c2KC3wtHT6— Arvind Mewada (@ArvindM81516288) October 5, 2021
एका युजरने इयर बड्स मागवले होते, परंतु बॉक्स ओपन केल्यानंतर तो रिकामा होता. अशा विश्वासू कंपनीकडून अशाप्रकारे समस्या येईल ही अपेक्षा नसल्याचं त्या व्यक्तीने म्हटलं आहे.
https://twitter.com/modish_razzz/status/1445254502802550788?t=GdOXmkzAvLwd25dMMPh51Q&s=19
एका युजरने रियलमीचे इयर बड्स ऑर्डल केले होते. त्याला त्याऐवजी डेटॉल साबण डिलिव्हर झाल्याचं सांगत त्याने काही फोटो पोस्ट केले आहेत.
Wonderfull service by #Flipkart
Recieved dettol soap instead of realme ear buds.#flipkart asked me to share docs, i sent them all docs, but still issue not resolved yet…#fake_Service pic.twitter.com/Shpw06w9cY— Rajat Singal (@RajatSingal13) October 5, 2021
याआधीही अनेकांना फ्लिपकार्ट किंवा इतर ऑनलाइन शॉपिंग साइटवरुन खरेदी केल्यानंतर अशाप्रकारेच अनुभव आल्याच्या गोष्टी समोर आल्या आहेत.