देशातील तपास यंत्रणा या भाजपाचे कार्यकर्ते असल्यासारखे वागत आहेत: तेजस्वी यादव

0

दि.12: बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देशातील तपास यंत्रणांना खुले आव्हान दिले आहे. तपास यंत्रणांनी माझ्या घरी येऊन छापा टाकावा, असं ते म्हणाले. तसेच त्यांनी केंद्रतील भाजपा सरकावरही निशाणा साधला आहे.

एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुखालाखतीत तेजस्वी यादव यांनी भाजपा सरकारवर जोरदार टीका केली. ‘’देशातील तपास यंत्रणा या भाजपाचे कार्यकर्ते असल्यासारखे वागत आहेत. मात्र आम्ही त्यांना घाबरत नाही. मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना आमंत्रण देतो आहे की त्यांनी माझ्या घरी यावं. हवा तेवढा वेळ थांबाबं, हवी ती चौकशी करावी’’, असे ते म्हणाले.

‘’पाच वर्षापूर्वी आमचे गठबंधन तुटले. त्यावेळी नितीश कुमार अस्वस्थ होते. भाजपा त्यांच्यावर दबाव आणत होती. मात्र, आता झालेली युती ही पूर्वनियोजीत नव्हती. हा अचानक झालेला निर्णय होता. दोन्ही पक्षांच्या आमदारांनी बसून राजकीय परिस्थितीचा अंदाज घेत हा निर्णय घेतला’’, असेही ते म्हणाले.

2024 मध्ये नितीश कुमार पंतप्रधान पदाचे दावेदार असतील का? यावरही तेजस्वी यादव यांनी प्रतिक्रिया दिली. ‘’नितीश कुमार यांना प्रशासनाचा आणि सामाजिक कार्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे. ते केंद्रात मंत्रीही राहीले आहेत. जर नरेंद्र मोदी पंतप्रधान बनू शकतात, तर मग नितीश कुमार का नाही? मुळात या देशात पंतप्रधान कोणीही बनू शकतो’’, असे ते म्हणाले. तसेच यांनी 2024 मध्ये विरोधी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहनही केले. ‘’विरोधकांनी 2024 साठी एकत्र काम करायला पाहिजे. त्यासाठी एक रोडमॅप तयार करायला हवा. आपण आधीच खुप उशीर केला आहे’’, असे ते म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here