अकोला,दि.4: अकोल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांनी राष्ट्रवादीचे नेते आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनीही शिवा मोहोड यांच्यावर आरोप केले होते. अकोला राष्ट्रवादीतील हा वाद आता नव्या वळणावर पोहोचला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अकोला जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांनी प्रदेशाध्यक्षांसमोर आमदार मिटकरींवर कमिशनखोरीचे गंभीर आरोप केले होते. या आरोपांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता. त्यावर आमदार मिटकरींनी शिवा मोहोड यांच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
आता शिवा मोहोड यांच्यावर त्यांच्याच संस्थेतील सहायक शिक्षिकेने छळवणुकीचे आरोप केले आहेत. शिक्षिका मीना चव्हाण यांनी आरोप केला आहे की, मोहोड यांनी आदिवासी असल्याने छळवणूक केली.
शिक्षिकेच्या तक्रारीनंतर शिवा मोहोड यांच्यावर ॲट्रोसिटीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. तर मुंबई उच्च न्यायालयाने गुन्ह्याला स्थगिती दिल्याची शिवा मोहोड यांनी माहिती दिली आहे.
शिवा मोहोड यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. यावर मोहोड यांनी प्रतिक्रिया देत म्हणाले की, काहीतरी पाहायचं आणि शिवाला कोंडीत पकडायचं, असं काम केल्या जात आहेत. तुम्ही कितीही माझ्या विरुद्ध षडयंत्र रचा, मात्र दहा दिवसानंतर संपूर्ण प्रकरणाचा भांडाफोड करणारचं, असा इशारा नाव न घेता मिटकरींना दिलाय. आपण आमदार मिटकरींवर आरोप केल्यानंतरच हे जुनं प्रकरण समोर का?, असा सवालही त्यांनी केलाय.
शिवा मोहोड यांनी आपण आदिवासी असल्यानं छळवणूक केल्याचा शिक्षिकेचा आरोप. नोकरी वाचविण्यासाठी मोहोड यांनी पैसे मागितल्याचा शिक्षिकेचा आरोप. वर्गाबाहेर, शाळेबाहेर उभं करणं, अंगावर धावून जाण्याचे प्रकार शिवा मोहोड यांनी केल्याचा आरोप.
शिक्षिका मिना चव्हाण यांना मागच्या महिन्यात मोहोड यांच्या संस्थेनं शाळेतून बडतर्फ केलंय. शिवा मोहोड यांच्यापासून आपल्याला आणि कुटूंबाला धोका असल्याची शिक्षिकेची तक्रार. शिवा मोहोड यांना राजकीय संरक्षण असल्यानं कुठूनच न्याय मिळत नसल्याची महिलेची ‘एबीपी माझा’कडे खंत.








