Teacher Dance Video: शिक्षिका झाली आऊट ऑफ कंट्रोल, केला जबरदस्त डान्स

Teacher Viral Video: विद्यार्थ्यांच्या डान्स पाहून शिक्षिका झाली आऊट ऑफ कंट्रोल

0

नवी दिल्ली,दि.23: विद्यार्थ्यांचा डान्स पाहून शिक्षकेनी जबरदस्त डान्स (Teacher Dance Video) केला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ (Video) व्हायरल (Viral) होतात. अनेकदा विद्यार्थी शिक्षकांचे व्हिडिओ व्हायरल होतात. आता स्मार्टफोन आल्याने अनेक क्षण रेकॉर्ड करून पुन्हा पाहता येतात. पूर्वीच्या काळात फोटो पाहून कार्यक्रमाचा तपशील माहीत करून घ्यावा लागत असे. आता मात्र स्मार्टफोनमध्ये (चित्रीकरण) क्षण रेकॉर्ड करून ते सोशल मीडियावर शेअर करता येतात. असाच एक व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

शिक्षकाचा जबरदस्त डान्स | Teacher Dance Video

व्हायरल होणारा व्हिडीओ शाळेतील असून यामध्ये काही विद्यार्थी डान्स परफॉर्मन्स करताना दिसत आहे. सामुहिक कार्यक्रमात काही विद्यार्थी डान्स करत असताना शाळेतील शिक्षिकादेखील स्वतःला कंट्रोल करु शकल्या नाही. विद्यार्थ्यांचा डान्स सुरु असतानाच दोन शिक्षिका मधे येत डान्स करु लागल्या. त्यांना पाहून विद्यार्थ्यांनी मोठ्याने ओरडायला आणि टाळ्यांचा गजर करायला सुरुवात केली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून शिक्षिकेच्या डान्सचं कौतुक करत असून काहीजण त्यांना ट्रोलदेखील करत आहेत.

इन्स्टाग्रामवर yourfunzone नावाच्या हँडलवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यावर लोक जबरदस्त प्रतिक्रिया देत आहेत. मुलांसोबत नाचणाऱ्या शिक्षिकेच्या उत्कृष्ट डान्स मूव्ह्सही पहायला मिळत आहे. या व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून नेटकरी व्हिडीओला पसंती दर्शवत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here