शिक्षकाने आंघोळ करतानाचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर केला अत्त्याचार

0

हिंगोली,दि.3: शिक्षकाने आंघोळ करतानाचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर अत्त्याचार केल्याची घटना घडली आहे. शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी ही घटना हिंगोली जिल्ह्यात घडली आहे. शिक्षकाचा समाज घडविण्यात महत्वाचा वाटा असतो असे म्हटले जाते. परंतु हिंगोली जिल्ह्यात शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना घडली आहे. महिलेचे आंघोळ करतानाचे फोटो काढून त्याद्वारे तिला ब्लॅकमेल करुन वारंवार बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. हिंगोलीतील सेनगाव इथे हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

हेही वाचा विद्यार्थ्याने शिक्षेकेचा बाथरूममधील केला व्हिडिओ रेकॉर्ड

मिळालेल्या माहितीनुसार, सेनगाव इथला रहिवासी असलेला शिक्षक मारोती कोटकर याने संबंधित महिलेसोबत भाऊ असल्याचं सांगून जवळीक निर्माण केली. या शिक्षकाने महिलेचा पती घरी नसल्याची आणि ती घरात एकटीच असल्याची संधी साधत, तिचे आंघोळ करतानाचे फोटो काढले. हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत शिक्षकाने महिलेवर बलात्कार केला.

या घटनेने जिल्ह्यात खळबळ माजली आहे. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शिक्षक पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here