Talwarwala Baba: तलवारवाला बाबा यांचे साईबाबा यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य

0

मुंबई,दि.२३: तलवारवाला बाबा (Talwarwala Baba) म्हणून प्रसिद्ध असलेले हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संत युवराज महाराज (Talwarwala Baba On Saibaba) यांनी शिर्डी साईबाबा यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. त्यांचा वादग्रस्त विधान केलेला व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तलवारवाला बाबा यांनी देशभरातील हिंदू मंदिरातील साईबाबांच्या मूर्ती हटवण्याचे आवाहन केले आहे.

या प्रकरणी साईबाबा संस्थानकडून शिर्डी पोलीस ठाण्यात युवराज महाराजांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. युवराज यांच्या व्हायरल व्हिडिओमुळे वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे

तलवारवाला बाबा यांचे आक्षेपार्ह वक्तव्य Talwarwala Baba On Saibaba

साईबाबा मूर्तींना हातोड्याने तोडून गटारीत सोडा, साईबाबा मुस्लिम आणि व्याभिचारी असल्याचे संत युवराज यांनी म्हटलंआहे. जर तुम्ही मूर्ती हटवल्या नाही तर आम्ही जबरदस्ती त्या हटवू. हे अभियान आम्ही फरिदाबाबमधून सुरू केले आहे. साईबाबा मुस्लिम होते ते मांसाहारी होते आणि व्यभिचारी होते. असे त्यांनी म्हटले आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here