Vivo चा स्मार्टफोन घरी घेऊन जा केवळ १०१ रुपयांत

1

सोलापूर,दि.१९: Vivo चा स्मार्टफोन केवळ १०१ रुपये भरून घेता येणार आहे. दिवाळीत अनेकजण मोबाईल खरेदी करतात. अँड्रॉइड (Android) आणि आयफोन (iPhone) खरेदी करण्यात येतात. त्यातही अँड्रॉइड फोन खरेदी करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. अँड्रॉइड फोन खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मोबाईल कंपनी Vivo नं दिवाळी ऑफरची घोषणा केली आहे.

कंपनीच्या या ऑफरमध्ये X80 Series, V25 Series, Y75 Series, Y35 आणि दुसरे स्मार्टफोन्स डिस्काउंटसह विकणार आहे. Vivo Big Joys Diwali ऑफरला सुरुवात झाली असून येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत तुम्ही तुमच्या पसंतीचा मोबाईल खरेदी करू शकता. Vivo Big Joys दिवाळी दरम्यान स्मार्टफोनवर अनेक ऑफर्स, कॅशबॅक आणि एक्सटेंडेड वॉरंटी दिली जात आहे. यामध्ये सर्वात खास गोष्ट म्हणजे तुम्ही Vivo चा स्मार्टफोन फक्त १०१ रुपयांमध्ये घरी आणू शकता. 

Vivo १०१ रुपये ऑफर

ग्राहक केवळ १०१ रुपयांमध्ये Vivo स्मार्टफोन त्यांच्या घरी आणू शकतात. ऑफरमध्ये ग्राहकाला फक्त १०१ रुपये द्यावे लागतील. यानंतर ते V, X किंवा Y सिरीजचा कोणताही फोन घरी आणू शकतात. त्याचे उर्वरित पैसे मोबाईल धारकाला मासिक हप्त्यांमध्ये भरावे लागतील. मात्र याबाबत कंपनीकडून फारशी माहिती देण्यात आलेली नाही. म्हणजेच, कंपनी यावर व्याजदर आकारणार की नाही हे स्पष्ट नाही, आपण जवळच्या रिटेलरकडून अधिक माहिती मिळवू शकता. कंपनी लवकरच EMI बद्दल माहिती शेअर करू शकते असंही सांगितले जात आहे. 

Vivo दिवाळी ऑफर

Vivo बिग जॉयज दिवाळी सेलमध्ये अनेक ऑफर्स देत आहे. कंपनीने V, X किंवा Y सीरिज स्मार्टफोन्ससाठी वेगळ्या ऑफर्स जाहीर केल्या आहेत. ऑफर कालावधी दरम्यान, ग्राहकाला Vivo X80 किंवा X80 Pro वर ८००० रुपयांपर्यंतचा कॅशबॅक दिला जाईल. हा कॅशबॅक ICICI किंवा SBI EMI पर्यायासह उपलब्ध असेल. याशिवाय, तुम्ही पूर्ण रक्कम भरल्यास, एक्स-सीरीज स्मार्टफोनला ६ महिन्यांची अतिरिक्त वॉरंटी मिळेल. Vivo V25 सीरीज खरेदीवर ICICI किंवा SBI EMI पर्यायासह ४००० पर्यंतचा कॅशबॅक दिला जाईल. या फोनवर ६ महिन्यांची अधिक वॉरंटीही दिली जात आहे. Vivo Y सीरीज ग्राहक ICICI किंवा SBI EMI पर्यायासह रु. २००० पर्यंतचा कॅशबॅक घेऊ शकतात. याशिवाय, या सीरिजच्या डिव्हाइसवर Jio डिजिटल लाइफचा १० हजार रुपयांपर्यंतचा फायदा दिला जाईल. Y75, Y35 सारख्या फोनवर ६ महिन्यांची अतिरिक्त वॉरंटी आहे. 


1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here