दि.28: टी 20 भारत पाक मॅचमध्ये पाकिस्तानने टीम इंडियाचा पराभव केला. या मॅच संदर्भात व्हाट्सॲप स्टेटस ठेवल्याबद्दल एका शिक्षेकेला नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. नफीसा अटारी अस त्या शिक्षेकेचे नाव आहे. भारत पाक सामन्यात पाकिस्तानचा विजय झाल्यानंतर नफीसा अटारी यांनी ‘We Won’ असे व्हाट्सॲप स्टेटस ठेवले होते. नफिसा गटारी या राजस्थानमधील उदयपूरच्या नीरजा मोदी शाळेत शिक्षिका आहेत.
पाकिस्तानच्या विजयानंतर नफिसा गटारी यांनी ‘We Won’ स्टेटस ठेवल्यामुळे त्याचे जोरदार पडसाद उमटले. उदयपूरमधील अंबामाता पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. यानंतर खासगी शाळेनं नोकरीवरुन काढून टाकलं. जामिनावर सुटका झाल्यानंतर नफीसा यांनी माफी (Teacher Nafisa Attari apologizes) मागितली आहे.
नफीसा यांनी लोकांची नाराजी कमी करण्यासाठी व्हिडीओ प्रकाशित केला आहे. ‘आम्ही घरातील सदस्यांची दोन टीममध्ये विभागणी केली होती. आणि आमच्या-आमच्या टीमला पाठिंबा देत होतो. याचा अर्थ असा नाही की मी पाकिस्तान टीमची समर्थक आहे. मी भारतीय आहे. आय लव्ह इंडिया (I Love India) या देशावर मी तितकंच प्रेम करते जितकं तुम्ही सर्व करता,’ असं स्पष्टीकरण नफीसा यांनी दिलं आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान मॅचच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 25 ऑक्टोबर रोजी शाळेने त्यांना नोकरीवरुन काढत असल्याचं पत्रक जारी केलं आहे. नीरजा मोदी स्कूलच्या शिक्षिका नफीसा अटारी यांना सोजतिया चॅरिटेबल ट्रस्टच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला होता.