“दोस्ती भुजबळ साहब के साथ होती है, जरांगे सारख्या…” टी.पी. मुंडे

0

इंदापूर,दि.9: पुणे जिल्ह्याच्या इंदापूरमध्ये आज ओबीसी मेळावा पार पडत असून, याच सभेतून टी.पी. मुंडेंच्या (T P Munde) घोषणेने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण मनोज जरांगे यांच्यावर टीका करतांना, ‘कोण आला रे कोण आला जरांगेचा बाप आला’ अशी घोषणा मुंडे यांनी दिली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. तर, यावर आता जरांगे यांची काय प्रतिक्रिया असणार आहे हे पाहणं महत्वाचे असणार आहे.

दरम्यान, यावेळी बोलतांना टी.पी. मुंडे म्हणाले की, “मराठा समाजाने आपले शोषण केलं. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो तरी आहे का? जरांगेच्या शेजारी आणि आरक्षण मागतो आहे. 2024 साली ओबीसीचे मुख्यमंत्री छगन भुजबळ झाले पाहिजे. तसेच, उपमुख्यमंत्री प्रकाश शेंडगे यांना करा आणि यांना वठणीवर आणायचे असेल तर गृहमंत्री टी.पी. मुंडे यांना करा.

आमच्या हाताला ऊस तोडून फोड आले. आता पाटील तुम्ही बाजूला सरा आणि कोयता तोडण्याऱ्याना चाव्या द्या. दोस्ती भुजबळ साहब के साथ होती है, जरांगे सारख्या गद्दारी करणे वालो से नही होती. कोण आला रे कोण आला जारांगेचा बाप आला. तो म्हणतो पांढऱ्या दाढीचा, त्याचा बापाची केस पांढरे आहेत. बापाची केस पांढरे असणार की, जरांगे जरा जपून बोला. जालना येथे हल्ला झाला, पण निलंबित फक्त ओबीसी समाजाचे अधिकारी झाले. शिंदे सरकारला सांगतो आहे, त्यांना ताबडतोब कामावर घ्या,” असेही मुंडे म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here