अक्कलकोट,दि .25: सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारल्यापासून अक्कलकोटला अनेक वेळा येणे जाणे झाले. परंतु स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी महोत्सवात स्वामी समर्थांचे दर्शन घेण्याचे आज मोठे भाग्य लाभले असल्याचे मनोगत सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी व्यक्त केले. त्यांनी नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले.
याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी त्यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी बोलताना सातपुते यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, मंदार पुजारी, व्यंकटेश पुजारी, डीवायएसपी राजेंद्रसिंह गौर, पीआय जितेंद्र कोळी, धनराज शिंदे, गजानन शिंदे, शरद चव्हाण, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, विपुल जाधव, संजय पवार, संतोष पुजारी, ओंकार पाठक, प्रसाद पाटील, शिवशरण अचलेर, दीपक जरीपटके, आदीसह स्वामी भक्त उपस्थित होते.