Seema Patra Arrested: भाजपाच्या निलंबित महिला नेत्या सीमा पात्रा यांना अटक

0

दि.31: Seema Patra Arrested: झारखंडचे निवृत्त आयएएस अधिकारी यांच्या पत्नी आणि निलंबित भाजपा नेत्या सीमा पात्रा (Seema Patra Arrested) यांना बुधवारी सकाळी अटक करण्यात आली. त्या रांचीमधून पळून जाण्याचा प्रयत्न करत होत्या पण अरगोडा पोलिसांच्या पथकाने त्यांना पकडले. सीमावर तिच्या घरात काम करणाऱ्या सुनीता नावाच्या मोलकरणीचा प्रचंड छळ आणि थर्ड डिग्रीचा छळ केल्याचा आरोप आहे.

मंगळवारी पोलिसांनी कलम 164 अन्वये न्यायालयात सीमा पात्राच्या कैदेतून सुटलेल्या सुनीताचा जबाब नोंदवला आहे. आपल्या जबाबात तिने स्वतःवर झालेल्या अत्याचाराची संपूर्ण कहाणी न्यायालयासमोर सांगितली आहे.

आरोपी सीमा पात्रा या झारखंडच्या रहिवासी आहेत. त्या माजी आयएसएस अधिकारी माहेश्वर पात्रा यांच्या पत्नी आहेत. सीमा पात्रा गेल्या आठ वर्षांपासून पीडित आदिवासी महिला सुनीता यांचा छळ करत होत्या. सीमा पात्रा यांनी पीडित महिलेला आपल्या जीभेनं शौचालय चाटून स्वच्छ करण्यास भाग पाडल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या आरोपानंतर सीमा पात्रा यांची भाजपा पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

सीमा पात्रा यांच्या मुलीने सुनीता यांना 10 वर्षांपूर्वी घरकामासाठी ठेवलं होते. मात्र, सीमा पात्रा या सुनीताला काठीने मारहाण करत. राग अनावर झाल्यावर गरम तव्याचे चटके आणि दात तोडल्याचा आरोपही सुनीताने लावला आहे. तसेच, जेवण न देता तिला खोलीमध्ये बंद देखील करण्यात येत असल्याचे सुनीताने सांगितलं.

आरोपी सीमा पात्रा यांचा मुलगा आयुष्मान यानं पीडित महिलेला वाचवलं आहे. त्यानेच सर्वप्रथम घरात घडणाऱ्या कृत्याची माहिती आपला मित्र विवेक बस्के याला दिली. त्यानंतर पीडितेनं तिच्यावर होणाऱ्या अत्याचाराची माहिती विवेक यास दिली. यानंतर आयुष्मानने विवेकच्या मदतीने पीडितेची सुटका केली. हा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच रांचीतील अरगोडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यावर आता आरोपी सीमा पात्रा यांना अटक करण्यात आली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here