Sushma Andhare | शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांचे वारकऱ्यांबाबत मोठं वक्तव्य

Sushma Andhare | अंत्ययात्रेत भगवा फेटा घालून कुणी बसत नाही सुषमा अंधारे यांचे वक्तव्य

0

मुंबई,दि.१४: शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी वारकऱ्यांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्राने अंधश्रद्धा निर्मुलन कायदा केला आहे. मी कुणाच्या श्रद्धेच्या आड नाही. माझी अंत्ययात्रा काढली गेली. खऱ्या वारकरी संप्रदायात अशी अंत्ययात्रा नसते. अंत्ययात्रेत भगवा फेटा घालून कुणी बसत नाही. भगवा रंग भागवत् धर्माची परंपरा आहे. त्याचा तो अवमान आहे. हे जे लोक भूंकतायेत त्यावर जास्त बोलू नये. अंत्ययात्रा ही भाजपाची स्टंटबाजी आहे. अल्पवयीन मुलांचा त्यात गैरवापर केला आहे. वारकऱ्यांनी राजकारणात घुसू नये अशा शब्दात शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

सुषमा अंधारे म्हणाल्या की, गणेश शेटे तेच आहेत जे कोविड काळात २०१९ आणि २०२० ला मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला तेव्हा उद्धव ठाकरेंचा राजीनामा मागितला होता. तुषार भोसले आणि हा कंपू यांनी वारी बंद केल्यामुळे रान पेटवले होते. जे कधीच वारीत पायी चालली नाही. कोविड काळात लोकांचे आरोग्य न लक्षात केवळ राजकीय स्टंट केले. कारण भाजपाकडून उघडलेली वारकरी आघाडी आहे त्यातील हे लोक आहेत. देहू आळंदीत ज्यांनी मोदींना पाचारण केले, तिथे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोलू दिलं नव्हतं. भाजपाची ही आघाडी कधीच आम्हाला मतदान करत नव्हती. त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार? असा आरोप त्यांनी केला. 

सुषमा अंधारे

मी कधीच राजकीय पक्षाची माफी मागत नाही

तसेच निव्वळ राजकीय पक्षाचे लोक उकसवत असतील. मी कधीच राजकीय पक्षाची माफी मागत नाही. पण तरीसुद्धा माझ्या बोलण्यातून कळत-नकळत कुणी दुखावलं असेल तर मी जाहीर माफी मागताना काहीही गैर वाटणार नाही. मी शिवसेनेत आल्यापासून असेल किंवा २०१८ पासून या विषयांमध्ये जात नाहीत. प्रबोधनकार ठाकरेंचा मी वारसा चालवत असेन, वंदनीय बाळासाहेबांना कर्मकांड अपेक्षित नसतील. कर्मकांड माझ्या तत्वात नाही. मी भागवत धर्माचा अपमान कधी करू शकत नाही. काही लोक राजकारण करताय असं सांगत सुषमा अंधारे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. 

बदनाम करण्याचं षडयंत्र

१४ सेकंदाच्या व्हिडिओ फिरवला गेला. पण माझं पूर्ण वाक्य असं होतं की, दादाहो, तुम्ही रेड्यामुखी वेद गायले मग आमचे गोरगरीब माणसं ज्ञानापासून वंचित राहावे असं कुठल्या धर्माला वाटेल. धर्म आणि सामान्य माणसांतील एजेंटांनी हे षडयंत्र केलंय का की गोरगरिबांना शिक्षण मिळू नये. दुसरा व्हिडिओ आहे तोही अर्धवट आलाय. ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली आणि माऊली म्हणवली. माझी आई ही माझ्यासाठी विश्ववंदनीय माऊली आहे असं मी बोलले असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here