सोलापूर,दि.14: कर्नाटकचा मुख्यमंत्री ठरविण्यासाठी काँग्रेसने माजी गृहमंत्री ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांच्यासह तीन जणांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने 136 जागा जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. विधानसभा निवडणुकीत एकहाती विजय मिळवल्यानंतर कर्नाटकचा पुढचा मुख्यमंत्री कोण, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर मोठी जबाबदारी | Sushilkumar Shinde
सुशीलकुमार शिंदे दुपारी चार वाजता सोलापूर विमानतळावरून खास विमानाने बंगळुरूकडे रवाना झाले. कर्नाटकमध्येकाँग्रेसला स्पष्ट बहुमत आल्यानंतर आता तिथे मुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार याची चर्चा देशभर रंगली आहे. त्यातच, प्रदेशाध्यक्ष डीके. शिवकुमार आणि सिद्धरामैय्या यांची नावे प्राधान्याने पुढे आहेत. मात्र, या दोनपैकी एका नावावर शिक्कामोर्तब करण्यासाठी आता सुशीलकुमार शिंदे यांचं मत महत्त्वाचं ठरणार आहे.
या ऐतिहासिक कामगिरीचे हिरो असलेले माजी मुख्यमंत्री सिद्धरमय्या आणि प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार या दोघांची नावे मुख्यमंत्रिपदासाठी आघाडीवर आहेत. तो तिढा सोडविण्यासाठी काँग्रेसने पक्षनिरीक्षक म्हणून माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर जबाबदारी टाकली आहे.
कर्नाटकात आता सत्तास्थापनेला वेग आलेला आहे. त्यामुळेच पक्षनिरीक्षक म्हणून सुशीलकुमार शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिंदे यांच्यासोबत दोन सहनिरीक्षकही असणार आहेत. नव्या मुख्यमंत्र्यांचे नाव जाहीर होईपर्यंत शिंदे हे बंगळूरूमध्येच असणार आहेत. कर्नाटक काँग्रेसमधील घडामोडींवर लक्ष ठेवण्याची जबाबदारीही शिंदे यांच्यावर सोपविण्यात आलेली आहे.
कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला. कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. काँग्रेसचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष डि.के. शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची नावे चर्चेत आहे. पक्षाचा नवा विधिमंडळ नेता ठरवण्यासाठी काँग्रेस हायकमांडने सुशीलकुमार शिंदे, काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी जितेंद्र सिंग, दीपक बाबारिया यांची समिती नेमली आहे. सुशीलकुमार शिंदे एका लग्न समारंभासाठी रविवारी सोलापुरात आले होते. काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव के.सी. वेणुगोपाल यांचा त्यांना फोन आला. आपल्यासाठी पक्ष खास विमान पाठवेल. आपण सायंकाळपर्यंत बंगळूरमध्ये यावे, असा निरोप दिला. सुशीलकुमार शिंदे आणि शहराध्यक्ष चेतन नरोटे सोलापूर विमानतळावरून बंगळूरकडे रवाना झाले.