काँग्रेस युवक अध्यक्ष पदासाठी मोची समाजातून ‘सुशीलकुमार’ला पसंती

0

सोलापूर,दि.८ : काँग्रेस पक्षाच्या युवक पदाधिकाऱ्यांच्या राज्य स्तरावरील निवडणूकीचा कार्यक्रम सध्या सुरू आहे. अतिशय चुरशीची ही निवडणूक असल्याने संपूर्ण महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.

राज्य अध्यक्ष, राज्य सरचिटणीस, जिल्हाध्यक्ष, शहर अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, अशासह सर्वच पदाच्या निवडी होत आहेत, २७ ऑक्टोबर पासून सदस्य अभियान सुरू केले आहे. 

या माध्यमातून युवकांना राजकारणात संधी देण्यात येणार असून जो जास्त युवक कार्यकर्त्यांच्या नोंदणी करेल आणि मतदान करून घेईल तो अध्यक्ष होईल अशा प्रकारची ही निवडणूक प्रक्रिया आहे. ऑनलाइन पद्धतीची ही निवडणूक असल्याने हा चर्चेचा विषय असून सोलापूर शहरात युवक अध्यक्ष पदासाठी अनेक जण इच्छुक आहेत.

विद्यमान शहर युवक अध्यक्ष अंबादास करगुळे यांना वयाचा अटीमुळे या निवडणुकीला पुन्हा उभारता आले नाही त्यामुळे त्यांनी आपल्या मेव्हण्याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले असल्याची माहिती आहे. त्याच बरोबर कॉंग्रेसची विद्यार्थी संघटना असलेल्या यांनी एनएसयुआय संघटनेचे अध्यक्ष गणेश डोंगरे हेसुद्धा निवडणूक रिंगणात आहेत. काँग्रेस पक्षाला सोलापूर शहरात विशेषता मोची समाजाचा एक गठ्ठा मतदान असतो, कोणीही आले तरी हा मतदानाचा गठ्ठा कधीही तुटत नाही हा अनेक वर्षापासूनचा इतिहास आहे. 

याच मोची समाजातील काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते असलेले बसवराज म्हेत्रे यांचे चिरंजीव सुशीलकुमार म्हेत्रे हे सुद्धा युवक अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. त्यांनीही निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे. मोची समाजातून त्यांना सर्वाधिक पसंती दिली जात असल्याचं बोललं जातंय, आमदार प्रणिती शिंदे यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते असलेले सुशीलकुमार म्हेत्रेंनी जोरदार फिल्डिंग लावली असून युवकांची बांधणी आणि नोंदणी करण्यास सुरुवात केली आहे.

मोची समाजात एकाच घरात आजपर्यंत अनेक पदे मिळाली त्यामुळे आता निश्चित बदल अपेक्षित असल्याची चर्चा समाजातून असून सुशीलकुमार म्हेत्रे यांना यंदा युवकच्या कार्यकारिणीत संधी देण्यासाठी समाज एकत्र आल्याची चर्चा ऐकण्यास मिळत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here