Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादवचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत मोठे विधान 

0
Suryakumar Yadav On PM Narendra Modi

सोलापूर,दि.२९: Suryakumar Yadav On PM Narendra Modi: आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानला ५ विकेट्सने पराभूत केले आणि नवव्यांदा स्पर्धा जिंकली. भारताच्या विजयानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X वर पोस्ट करत टीमचे अभिनंदन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले कौतुक विशेष असल्याचे टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला. भारतीय संघाने पाकिस्तानला चितपट करत या स्पर्धेतील दबदबा कायम राखला.

ऑपरेशन सिंदूर’चा दाखला देत पंतप्रधानांनी भारतीय संघाचे अभिनंदन केले. मोदींनी X वर पोस्ट करत म्हटले  “खेळाच्या मैदानावर #ऑपरेशनसिंदूर. निकाल एकच आहे. भारत जिंकला! आमच्या क्रिकेटपटूंचे अभिनंदन.” यावर सूर्यकुमार यादव यांची प्रतिक्रिया आता समोर आली आहे.

वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना सूर्यकुमारने सांगितले की, आम्ही न हरता ही स्पर्धा जिंकली ही माझ्यासाठी खूप चांगली भावना आहे. त्याच वेळी, कर्णधार सूर्यकुमार म्हणाला की, ट्रॉफी न घेणे हा माझ्यासाठी वाद नाही, परंतु ज्यांनी लोकांचे मन जिंकता आले तीच माझ्यासाठी खरी ट्रॉफी आहे.  

आशिया कप २०२५ मध्ये भारताच्या विजयानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी ( सूर्यकुमार यादव पीएम मोदी ) यांनी ट्विट करून खेळाडूंचे अभिनंदन केले. पंतप्रधान मोदींनी लिहिले, “मैदानावर ऑपरेशन सिंदूर. निकाल एकच होता: भारत जिंकला. आमच्या खेळाडूंचे अभिनंदन.” आता, कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी पंतप्रधान मोदींच्या ट्विटवर आनंद व्यक्त केला.

सूर्यकुमार यादवने केले पंतप्रधान मोदींचे कौतुक | Suryakumar Yadav On PM Narendra Modi

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सूर्यकुमार म्हणाला की, जेव्हा देशाचा नेता स्वतः फ्रंटफूटवर फलंदाजी करतो तेव्हा खेळाडूंना अधिक आत्मविश्वास मिळतो. देशाचा नेता जेव्हा स्वतः फ्रंटफूटवर खेळतो तेव्हा खूप छान वाटतेजणू काही त्यांनी स्वतःस्ट्राईक घेतला आणि धावा काढल्या असे वाटलेत्यांना असे पाहून खूप छान वाटलेजेव्हा ‘सर‘ समोर उभे असतात तेव्हाखेळाडू देखील मोकळेपणाने खेळतात.”


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here