महाराष्ट्रातील निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय 

0

नवी दिल्ली,दि.28: महाराष्ट्रातील निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. नगरपंचायत निवडणुका जाहीर झाल्या आहेत. महानगरपालिका निवडणुका तारखा जाहीर होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयात निवडणुकीतील 50 टक्के आरक्षणाबाबत आज सुनावणी झाली. 

सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकीवर कोणतीही स्थगिती आणलेली नाही. नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका ठरलेल्या वेळेनुसार होणार आहेत. सुप्रीम कार्टात 21 जानेवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे. महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायत निवडणूक ठरल्याप्रमाणे होईल असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे.

निवडणुकीत आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडण्यात आली असून 15 जिल्ह्यांमध्ये सरपंच आरक्षणातही 50 टक्क्यांचा निकष पाळण्यात आलेला नाही असा आक्षेप नोंदवण्यात आला आहे. हे प्रकरण आता जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात प्रथम तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. 

इतर स्थानिक स्वराज्य संस्थांसंदर्भात राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोग यांना निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यास मुभा असमार आहे. मात्र, या संस्थांमध्ये आरक्षण 50% पेक्षा जास्त ठेवले जाऊ नये. ही अटही अंतिम निकालावर अधीन राहणार आहे.

दरम्यान, नगरपालिका आणि नगर पंचायती यांच्या निवडणुका जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार होऊ शकतात.  मात्र, ज्या 40 नगरपालिका आणि 17 नगर पंचायतींमध्ये आरक्षण 50% पेक्षा जास्त आहे, त्यांच्या निवडणूक निकालांना या प्रकरणाच्या अंतिम निर्णयाचे अधीन राहावे लागेल, असंही कोर्टाने म्हटले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here