नवी दिल्ली, दि.27: Maharashtra: महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या अर्जावर आज न्यायालयात सुनावणी झाली. दोन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. शिंदे गटाच्या वतीने नीरज किशन कौल यांनी युक्तिवाद केला. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा उपाध्यक्ष आणि केंद्रासह अनेकांना नोटीस पाठवली आहे. पुढील सुनावणी 11 जुलै रोजी होणार आहे.
एकनाथ शिंदे गटाला दिलासा
सुप्रीम कोर्टानं सुनावणी 11 जुलैपर्यंत पुढे ढकलली. अपत्रातेविरोधातील नोटीसवर उपाध्यक्षांना 11 जुलैपर्य़ंत कोणतीही कारवाई करता येणार नाही. नोटीस बजावण्यात आलेल्या आमदारांना 12 जुलैच्या संध्याकाळपर्यंत आपलं म्हणणं मांडता येणार आहे.
सुप्रीम कोर्टानं अजय चौधरी, नरहरी झिरवाळ, सुनील प्रभूंसह केंद्र सरकारलाही प्रतिज्ञापत्र सादर करण्याबाबतची नोटीस कोर्टानं बजावली आहे. यानंतरची सुनावणी 11 जुलै रोजी घेतली जाईल असंही जाहीर करण्यात आलं आहे.
ई-मेलमधून उपाध्यक्षांविरोधात आलेली नोटिस अधिकृत ई-मेलद्वारे पाठवण्यात आलेली नव्हती. त्यामुळे उपाध्यक्षांनी नोटीस फेटाळली; ्असा दावा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे वकील राजीव धवन यांनी कोर्टात केला.