Sunil Tatkare: राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे मोठे वक्तव्य 

0

मुंबई,दि.१९: Sunil Tatkare On NCP Merger राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. अनेकवेळा राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्या विलिनीकरणाबाबत चर्चा होते. मात्र दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा दोन्ही कडील नेत्यांमध्ये झाली नसल्याचे सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी सांगितले. 

काय म्हणाले सुनील तटकरे? Sunil Tatkare On NCP Merger 

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवर विलिनीकरणाची कसलीच चर्चा नसल्याने असे विलिनीकरण वगैरे कोसो दूर आहे. राष्ट्रवादी कॉग्रेसच्या विलिनीकरणाची कोणतीही चर्चा सुरू नाही. पण, असा काही निर्णय करायचा झाला तरी त्याबाबत भाजपाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला विचारावे लागेल. भाजपाच्या नेत्यांनी आम्हाला विचारपूर्वक स्वीकारले आहे. त्यामुळे विलिनीकरणाचे काही निर्णय घ्यायचे झाल्यास त्याची कल्पनाही भाजपाच्या नेत्यांना द्यावी लागेल, असे स्पष्ट मत सुनील तटकरे यांनी व्यक्त केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here