दि.5: Sunil Jakhar On Punjab CM: पंजाबचे प्रमुख काँग्रेस नेते सुनील जाखड (Sunil Jakhar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या पंजाब दौऱ्यादरम्यान ‘गंभीर सुरक्षेतील त्रुटी’वरून त्यांच्याच पक्षावर निशाणा साधला आहे. विशेष म्हणजे पंतप्रधानांच्या सुरक्षेचा ताफा 15-20 मिनिटे उड्डाणपुलावर अडकल्याने राज्यातील सत्ताधारी पक्ष काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप केले. पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुनील जाखड यांनी ट्विटमध्ये लिहिले की, ‘आज जे काही झाले ते मान्य नाही. ते पंजाबियतच्या विरोधात आहे. फिरोजपूरमध्ये भाजपच्या राजकीय सभेला संबोधित करण्यासाठी देशाच्या पंतप्रधानांना सुरक्षित मार्गाची खात्री द्यायला हवी होती. लोकशाही अशीच चालते.
विशेष म्हणजे रस्त्याने जात असताना काही आंदोलकांनी रास्ता रोको केल्याने पंतप्रधान मोदी 15 ते 20 मिनिटे उड्डाणपुलावर अडकले होते. या चुकांमुळे पीएम मोदी फिरोजपूरमधील कार्यक्रमात सहभागी न होता भटिंडा विमानतळावर परतले. यानंतर त्यांनी पंजाबमधील निवडणूक कार्यक्रम रद्द केला.
केंद्र सरकारने या हलगर्जीपणासाठी पंजाबच्या काँग्रेस सरकारला जबाबदार धरले आहे. गृह मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “पंतप्रधानांच्या कार्यक्रमाची आणि प्रवासाची योजना पंजाब सरकारला आधीच कळवण्यात आली होती. प्रक्रियेनुसार त्यांनी आवश्यक ती सुरक्षा व्यवस्था तसेच आकस्मिक योजना तयार ठेवणे आवश्यक होते. आकस्मिक योजना पाहता, पंजाब सरकारने रस्ता कोणत्याही हालचालीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था करायला हवी होती, जी स्पष्टपणे तैनात केलेली नव्हती. पंतप्रधानांच्या सुरक्षेतील गंभीर त्रुटींची दखल घेत गृह मंत्रालयाने राज्य सरकारकडून सविस्तर अहवाल मागवला आहे.