Sujat Ambedkar on brahmins: दंगली पेटवणारे हे ब्राह्मण असतात तर दंगलीत सहभागी होतात ते बहुजन पोरं असतात: सुजात आंबेडकर

0

मुंबई,दि.१२: Sujat Ambedkar on brahmins: वंचित बहुजन आघाडीचे (VBA) नेते सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्याला शिवाजी पार्कवर जाहीर सभा घेतली होती. यावेळी राज ठाकरे यांनी मशिदींवरील लाऊड स्पीकर काढावे लागतील अन्यथा आम्ही लाऊड स्पीकरवर हनुमान चालीसा लावू असे वक्तव्य केले होते.

यानंतर वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर यांनी आधी अमित ठाकरेंनी हनुमान चालीसा म्हणून दाखवावी, असं म्हटलं होते. राज यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना सुजात आंबेडकर यांनी रस्त्यावर उतरण्याचं खुलं आव्हानचं दिलं होतं. त्यासंदर्भात पुन्हा एकदा माध्यमांशी बोलताना सुजात आंबेडकर यांनी दंगली पेटवण्यासंदर्भात वादग्रस्त विधान केलं आहे. त्यावरुन, त्यांच्यावर पलटवारही करण्यात येत आहे. 

”आत्तापर्यंत आपण कितीही दंगली बघितल्या, मग ती बाबरी मस्जिदची दंगल असो किंवा भीमा-कोरेगावची दंगल असो. आपण हेच बघितलयं की, दंगली पेटवणारे हे उच्चवर्णीय आणि उच्चवर्णीय ब्राह्मण असतात. पण, त्यांच्या विधानावर प्रभावी होऊन, या दंगलीत सहभागी होतात ते जास्त करुन बहुजन पोरं असतात”, असं विधान सुजात आंबेडकर यांनी मीडियाशी बोलताना केलं होतं. 

तसेच, ”माझं राज ठाकरेंना एवढंच म्हणणं होतं की, तुम्हाला दंगल पेटवायची असेल किंवा लोकांना हनुमान चालिसा म्हणायला लावयची असेल तर बहुजन पोरांच्या आधी स्वत:च्या पोराला रस्त्यावर उतरवा. जर, तुम्ही स्वत:च्या पोराला रस्त्यावर उतरवणार नसाल तर दुसऱ्यांच्या पोराला रस्त्यावर उतरवू नका”, असेही सुजात यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना म्हटले आहे. त्यांच्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.  


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here