Sudhir Mungantiwar: सुधीर मुनगंटीवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसबाबत मोठा खुलासा

0

मुंबई,दि.21: Sudhir Mungantiwar On NCP: भाजपा नेते मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबाबत मोठा खुलासा केला आहे. न्यूज 18 लोकमतशी बोलताना मुनगंटीवार यांनी खुलासा केला आहे. 2014 चा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता सारखीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिला होता. पण, ‘शिवसेना धोकादायक होती म्हणून राष्ट्रवादी आमच्याकडे आली, आम्ही राष्ट्रवादीकडे गेलो नाही’ असा खुलासा भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केला.

सुधीर मुंगनटीवार यांचा खुलासा | Sudhir Mungantiwar

सागर परिक्रमेच्या 3 चरणाची सुरवात वसईतून करण्यात आली यावेळी वनमंत्री सुधीर मुंगनटीवार यांनी न्यूज 18 लोकमतला मुलाखत दिली. यावेळी बोलत असताना 2014 ला सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादीचा पाठिंबा का घेतला याचा खुलासा केला.

राष्ट्रवादीवर मुंगनटीवार यांचा खुलासा | Sudhir Mungantiwar On NCP

‘राष्ट्रवादीचे नेते आमच्याकडे आले ते म्हणाले, शिवसेना अशी धोकादायक आहे, आम्हाला स्थिर सरकार पाहिजे जनतेच्या हितासाठी काम करणार सरकार पाहिजे. महाराष्ट्राला प्रगती पाहिजे, खुर्चीवर प्रेम करणारे लोक नको. ज्यांचा जीव खुर्चीत अटकला अशा लोकांना सोडून आम्ही तुम्हाला मदत करायला तयार आहेत’ असा खुलासा मुनगंटीवार यांनी केला.

भारतीय जनता पार्टीने विचार केला चांद्या पासून बांद्या पर्यंत जनतेची सेवा करण्यासाठी सत्ता हे माध्यम आहे. सत्ता हे साधन आहे. सत्ता साध्य नाही त्यांना सत्तासाध्य होत त्यांनी बेमानी केली, गद्दारी केली. आज गद्दार एकीकडे आणि विचारांसाठी खुद्दारी करणारे खुद्दार भाजपसोबत आहेत, असंही मुनगंटीवार म्हणाले.

‘इतक शुद्र भावनिक राजकारण कोणी करू नये आपल्याला आमदार सांभाळता आले नाही. आपल्याला चांगलं वागता आलं नाही, भारतीय जनता पार्टीसोबत युती करून विश्वासघात केला. जनतेच्या मताचा अनादर केला, आता काय माशी किडे माकोडे आठवतात का? हे योग्य नाही आहे. राजकारण तुम्ही विकासाच केल पाहिजे प्रगतीचं केलं पाहिजे महाराष्ट्र धर्माचं केलं पाहिजे. देशाच्या विकासामध्ये महाराष्ट्राचा मोठा रोल राहिला आहे. त्याबद्दल बोलले पाहिजे माझ्या अंगावर माशी बसली होती, मच्छर बसला होता हे राजकारणाचा विषय आहे का ? असा टोलाही सुधीर मुंगनटीवार यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

‘जेव्हा तुमचे आमदार तुम्हाला सोडून जातात तेव्हा आत्मचिंतन करा ना… मंथन करा का आमदार निघून गेले. काय आपल्यामध्ये उणीव आहे. कशाला भाजपला दोष द्यायचा जर तुमच्या पक्षामध्ये विचारामध्ये आमदार टिकवण्याची शक्ती नसेल तर काहीतरी चूक होतंय की, आपला विचार चांगला आहे. पण विचार मांडणाऱ्यांमध्ये दोष आहे का ? हे तपासले आहे, असा सल्लाही मुनगंटीवार यांनी ठाकरेंना दिला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here