सोलापूर,दि.१२: भूसंपादन कामात जमीन मालकाला जास्तीची रक्कम दिल्या प्रकरणाची दखल घेऊन जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी प्रातांधिकारी हेमंत निकम यांच्या कार्यालयात जाऊन दप्तर तपासणी केली.
उत्तर सोलापूर तालुक्यतील मौजे बसवेश्वरनगर येथ राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन कामात ३ कोटी ४६ लाख ९ हजार २३३ रुपये मुल्यांकन होते. मात्र, जमीनमालकाला ५ कोटी ७८ लाख ७४ हजार ६३९ रुपये देण्यात आले आहेत. याबाबत सामाजिक कार्यकर्ते गणेश शितोळे यांनी केलेल्या तक्रारीवरून चौकशी झाली.
हेही वाचा कोट्यावधी रुपयांचा जमीन घोटाळा प्रकरण, उपविभागीय अधिकारी हेमंत निकम यांच्या चौकशीचे आदेश
उपजिल्हाधिकारी अरुणा गायकवाड यांनी तयार केलेल्या अहवालात संबंधीत जमीन मालकाला २ कोटी ७४ लाख ५ हजार ४०६ रुपयांची रक्कम जास्त गेल्याचे नमूद केले आहे. या प्रकरणी निकम यांना माहिती मागितली होती. त्यांनी ती अद्याप न दिल्याने त्यांना एक स्मरणपत्र पाठवले आहे. त्यात त्यांना तत्काळ माहिती सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
तरीही माहिती न दिल्याने मंगळवारी स्वतः जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी निकम यांच्या कार्यालयात जाऊन दप्तर तपासणी केली,गेल्या शनिवार पासून हि प्रक्रिया सुरू आहे.