विद्यार्थ्याचे उत्तरपत्रिकेतील उत्तर पाहून शिक्षक कोमात, विद्यार्थी जोमात

0

दि.18: उत्तरपत्रिकेत अनेक विद्यार्थ्यांनी चित्रपटाची कथा, गाणी लिहिलेली ऐकले असेल तसेच पाहिलेही असेल. अनेक विद्यार्थ्यांनी अभ्यास न केल्याने असे उद्योग करतात. अशाच एका विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका (Viral Answer Sheet) सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. ज्यामुळे चक्क शिक्षकही कोमात गेला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणारी विद्यार्थ्याची ही उत्तर पत्रिका पाहून तुम्ही थक्कच व्हाल. विद्यार्थ्याचं उत्तर सुरुवातीला योग्य वाटतं. पण जसजसं पुढे तुम्ही उत्तर वाचत जाल तर तुमचंही डोकं गरगरेल. उत्तराचं वैशिष्ट्यंही असं आहे की उत्तर जिथून सुरू होतं, तिथंच ते संपतं. विद्यार्थ्याला नेमकं काय सांगायचं आहे, याचं उत्तर तर फक्त तोच देऊ शकतो.

फन की लाइफ इन्स्टाग्राम अकाऊंटवर या उत्तरपत्रिकेचा फोटो शेअर करण्यात आला आहे. उत्तरपत्रिकेवरून भाखडा नागल डॅमबाबत प्रश्न विचारण्यात आल्याचं समजतं.

View this post on Instagram

A post shared by fun_ki_life (@fun_ki_life)

विद्यार्थी उत्तरात लिहितो, धरण सतलज नदीवर बांधलं आहे. पुढे तो सरदार पटेल, टाटा-बाय बाय, पंडित जवाहरलाल नेहरू, गुलाबाचं शेत, चीन, लंडन, जर्मनी आणि विश्वयुद्धापर्यंत पोहोचतो आणि शेवटी फिरून तो विद्यार्थी पुन्हा पंजाब, सतलज नदी आणि धरणावर पोहोचतो.

आता विद्यार्थ्यांचं टॅलेंट पाहून कुणीही थक्क होईल. या उत्तरपत्रिकेवर दहापैकी शून्य गुण देण्यात आले आहे. सोबतच शिक्षक कोमात आहे, अशी कमेंटही या उत्तरपत्रिकेवर दिलेली असल्याचं दिलं आहे. एकाच पानावर इतिहास, भूगोल, कला, साहित्य सर्वकाही दिसलं तर शिक्षकासाठी हा मोठा धक्काच आहे. हा धक्का शिक्षकाला सहन न होणाराच आहे. ज्या शिक्षकाच्या हातात ही उत्तरपत्रिका येईल तो शिक्षक कोमात जाणार नाही तर काय?


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here