पुणे, दि.१ एप्रिल २०२२: घरी येऊन विद्यार्थ्याला शिकवायला आलेल्या शिक्षिकेचे बाथरूममध्ये मोबाईल लपवत १६ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्याने शूटिंग केल्याच्या खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील कर्वेनगर परिसरात हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पीडित महिलेचे वय ५६ वर्षे असून , त्या महिलेने अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पीडित महिला संबंधित मुलाच्या घरी इंग्रजी विषयाची शिकवणी घेण्यासाठी जात होती.
शिक्षणाचे माहेरघर असणाऱ्या पुण्यातच शिक्षक-विद्यार्थ्यांच्या पवित्र नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
पीडित महिला त्यामुलाच्या घरातील वॉशरूममध्ये गेल्य. मात्र पीडित महिला वॉशरूममध्ये जाण्याच्या अगोदर आरोपी मुलगा वॉशरूमध्ये गेला. त्याने तिथे मोबाईमधील व्हिडीओ रेकॉर्डिंग सुरु करून मोबाईल लपवून ठेवला. त्यानंतर पीडित महिला वॉशरूमध्ये गेल्यानंतर तिचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. याच दरम्यान वॉशरूमध्ये साबणाच्या खोक्याच्या मागे काहीतरी चमकत असल्याचे त्यांना जाणवले. त्यांनी खोक्याच्या मागे बघितले असता. त्यांना तिथे मोबाईल आढळून आला.
त्यांनी मोबाईल हातात घेऊन बघितला असता त्यात व्हिडीओ रेकॉर्डिंग सुरु असल्याचे समोर आले. त्यांनी मोबाईल तपासला असता त्यामधे त्यांचे वॉशरूममधील व्हिडीओ रेकॉर्ड केल्याचे दिसून आले. या घटनेमुळे पीडित महिलेला मोठा मानसिक धक्का बसला. त्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेत आरोपीच्या विरोधात पोलीसात तक्रार केली आहे. यापूर्वीही एकदा आरोपी मुलाने पीडित महिलेच्या छातीचे व्हिडीओ रेकॉर्डिंग केले होते.
पिडीत शिक्षिकेच्या फिर्यादीवरून पुण्यातील अलंकार पोलीस स्टेशन मध्ये अल्पवयीन मुलाला विरोधात विनयभंग आणि आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या घटनेमुळे शिक्षणाचं माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुणे शहरात एकूणच खळबळ उडाली आहे. गेल्या ५ वर्षांपासून ज्या विद्यार्थ्याला शिकवणी देण्यास आपण त्याच विद्यार्थ्याने असे किळसवाणे कृत्य केल्याने शिक्षिकेला प्रचंड मानसिक धक्का बसला आहे.
अल्पवयीन मुलांवर आयपीसी ३५४(६) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा ६६६० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून मोबाईल ताब्यात घेण्यात आला आहे. आरोपी अल्पवयीन मुलाला चाईल्ड वेल्फेअर कमिटी समोर हजर करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र सहाणे यांनी दिली आहे.