Solapur Accident: अक्कलकोट मैंदर्गी मार्गावर एसटी बसला अपघात

0

अक्कलकोट,दि.24: Solapur Accident अक्कलकोट मैंदर्गी मार्गावर एसटी बसला अपघात झाला आहे. सोलापूर ते गाणगापूर एसटी बसला अक्कलकोट मैंदर्गी मार्गावर देशमुख शेतालगत एसटी बस पलटी झाली.

एसटी बसमधील 15 ते 20 प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमी प्रवाशांना अककलकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता असून खाजगी डॉक्टर ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले आहेत.

अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी घटनास्थळी पोहचून, त्यांनी बस मधिल प्रवाशांना बाहेर काढण्याकामी मदत केली.

आठ ते दहा रुग्णानां सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाकडे तातडीने घेऊन जाणयात आले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here