एसटी बस नर्मदा नदीत कोसळली, 13 जणांचा मृत्यू

0

दि.18: एसटी बस नदीत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. मध्य प्रदेशमधून अपघाताची मोठी बातमी आली आहे. इंदूरहून अमळनेरच्या दिशेनं जाणारी एसटी महामंडळाची बस पुल तोडून नर्मदा नदीत कोसळली. या अपघातात 13 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. धार जिल्ह्यातील खलघाट इथंही घटना घडली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे पथक पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यातील खलघाट इथं ही घटना घडली आहे. आज सकाळी 9.45 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. बलकवाडा येथील खलटाका पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या नर्मदा नदीच्या पुलावर ही घटना घडली आहे.

इंदूरवरून ही बस महाराष्ट्रातील अमळनेरकडे येत होती. मुसळधार पाऊस सुरू असताना अचानक चालकाचे नियंत्रण सुटले आणि पुलावरून बस नर्मदा नदीत कोसळली. या बसमध्ये 50 ते 60 प्रवाशी असल्याचे सांगितले जात आहे. आतापर्यंत 13 जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. तर 12 ते 15 जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. अजूनही बचावकार्य सुरू आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

इंदूरजवळ अपघात झालेली एसटी बस MH 40 N 9848 ही जळगाव जिल्ह्यातील अमळनेर आगारची असल्याची माहिती समोर आली आहे. इंदूरमधून ही बस सकाळी 7.30 ला अमळनेरच्या दिशेनं रवाना झाली होती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here