SSC Result: दहावी परीक्षेच्या निकालाच्या संदर्भात महत्वाची अपडेट, निकाल…

0

मुंबई,दि.29: SSC Result: दहावी परीक्षेच्या निकालाच्या संदर्भात महत्वाची अपडेट, निकाल वेळेत लागण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. त्यामुळे आता प्रतीक्षा आहे ती निकालाची… दहावीचा निकाल (SSC Class 10th Result 2023) कधी लागणार याची उत्सुकता सर्व विद्यार्थी आणि पालकांना आहे. दहावी परीक्षेच्या निकालाच्या तारखेसंदर्भात बोर्डाकडून लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. दहावीच्या परीक्षेचा निकाल हा जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.

निकाल वेळेत जाहीर होणार | SSC Result

दहावीच्या निकालाची (HSC Resut 2023) तारीख या आठवड्यात जाहीर होण्याची आहे. बोर्डाकडून निकालाची तयारी पूर्ण झाल्याची माहिती आहे. थोडक्यात काय तर, Maharashtra State Board कडून परीक्षांच्या निकालांसंबंधी सर्व तयारी पूर्ण झाली असून लवकरच तारीख जाहीर करण्यात येणार आहे. जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी सात दिवस पुकारलेल्या संपामुळे दहावी बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल उशिरा जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र संप मागे घेतल्यानंतर शिक्षकांनी हे काम प्राधान्याने हाती घेतल्याने बारावी बोर्ड परीक्षा निकाल वेळेत जाहीर झाला. त्यामुळे दहावीचा निकाल देखील वेळेतच जाहीर होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2023 मध्ये घेण्यात येणारी दहावीची लेखी परीक्षा 2 ते 25 मार्च या कालावधीत होत आहे. यंदा 23 हजार 10 शाळांमधील 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. परंतु मागील पाच वर्षाच्या तुलनेत यंदा परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांची नोंदणी तब्बल 61 हजार 708 ने कमी झाली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here