SSC Result 2023: उद्या लागणार दहावीचा निकाल, असा पाहा निकाल

0

मुंबई,दि.1: SSC Result 2023: दहावीच्या निकालाची धाकधूक असणाऱ्या सर्व विद्यार्थी पालकांसाठी उद्याचा दिवस महत्वाचा असणार आहे. दहावीच्या निकालासंदर्भात (SSC Result 2023) मोठी माहिती समोर आली आहे. उद्या म्हणजेच 2 जून रोजी 1 वाजता निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्र बोर्ड पुणे कार्यालयातून सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर करणार आहे.

असा पाहा निकाल | SSC Result 2023

उद्या दुपारी एक वाजता हा निकाल बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पाहता येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) SSC म्हणजेच 10वी परीक्षेचा निकाल http://mahahsscboard.in आणि http://mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध होणार आहे. SSC Result 10वी चा निकाल कसा पाहाल? अधिकृत वेबसाइट http://mahresult.nic.in वर लॉग इन करा.महाराष्ट्र एसएससी निकाल 2023 लिंकवर जा सीट नंबर आणि तुमच्या आईचे नाव टाकून लॉगिन करा आणि तुमचा 10वीचा निकाल तपासा. SSC Result 2023

महाराष्ट्र एसएससी परीक्षा 2023 2 मार्च ते 25 मार्च या कालावधीत घेण्यात आली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2023 मध्ये घेण्यात येणारी दहावीची लेखी परीक्षा 2 ते 25 मार्च या कालावधीत होत आहे. यंदा 23 हजार 10 शाळांमधील 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. परंतु मागील पाच वर्षाच्या तुलनेत यंदा परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांची नोंदणी तब्बल 61 हजार 708 ने कमी झाली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here