SSC HSC Exam Date: दहावी बारावी परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक जाहीर

0

सोलापूर,दि. २२:SSC HSC Exam Date: इयत्ता दहावी व बारावीच्या लेखी परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर मंगळवारी जाहीर झाले.दहावीची लेखी परीक्षा दि. १५ मार्च ते दि. ४ एप्रिल या कालावधीत पार पडणार आहे. तर बारावीची लेखी परीक्षा ४ मार्च ते ३० मार्च या कालावधीत होणार आहे. (SSC HSC Exam Date: Detailed schedule of 10th and 12th exams announced)

दहावीचा १५ मार्च रोजी प्रथम भाषा विषयाचा पेपर होणार आहे. १६ मार्च रोजी द्वितीय व तृतीय भाषा, २१ मार्च रोजी हिंदी, २२ मार्च रोजी संस्कृत, उर्दू, गुजराती, इतर द्वितीय आणि तृतीय भाषा, २४ मार्च रोजी गणित भाग-१, २६ मार्च रोजी गणित भाग-२, २८ मार्च रोजी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १, ३० मार्च रोजी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग २, १ एप्रिल रोजी सामाजिक शास्त्र पेपर १, ४ एप्रिल रोजी सामाजिक शास्त्र पेपर २ या विषयांचा पेपर होणार आहे.

बारावीचा ४ मार्च रोजी इंग्रजी विषय, ५ मार्च रोजी हिंदी, ७ मार्च रोजी मराठी, गुजराथी व कन्नड, सिंधी, मल्ल्याळम, तामिळ, तेलगु, पंजाबी व बंगाली, ८ मार्च रोजी महाराष्ट्री प्राकृत, संस्कृत, ९ मार्च रोजी वाणिज्य संघटन व व्यवस्थापन, १० मार्च रोजी तर्कशास्त्र, भौतिकशास्त्र, ११ मार्च रोजी चिटणिसाची कार्यपद्धती, व गृहव्यवस्थापन, १२ मार्च रोजी रसायनशास्त्र, १४ मार्च रोजी गणित आणि संख्याशास्त्र, १५ मार्च रोजी बालविकास, कृषि विज्ञान आणि तंत्रज्ञान, पशुविज्ञान आणि तंत्रज्ञान, १६ मार्च रोजी सहकार, १७ मार्च रोजी जीवशास्त्र, भारतीय संगीताचा इतिहास व विकास, १९ मार्च रोजी भूशास्त्र, २१ मार्च रोजी वखशास्त्र,२२ मार्च रोजी अन्नविज्ञान व तंत्रज्ञान,२३ मार्च रोजी द्विलक्षी अभ्यासक्रम, वाणिज्य गट पेपर १,२५ मार्च रोजी द्विलक्षी अभ्यासक्रम, २५ मार्च रोजी मत्स्य व्यवसाय गट या विषयांची परीक्षा होणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here