SSC HSC Exam 2023: दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर

0

मुंबई,दि.30: SSC HSC Exam 2023: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक (SSC HSC Exam Timetable 2023) जाहीर करण्यात आले आहे. बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारीत तर दहावीची लेखी परीक्षा मार्च महिन्यात सुरू होणार आहे. बोर्डाकडून अंतिम परीक्षेचं वेळापत्रक आज संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे.

SSC HSC Exam 2023 अंतिम वेळापत्रक जाहीर

बारावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी 2023 ते 21 मार्च 2023 या कालावधीत होणार आहे. तर दहावीची लेखी परीक्षा 2 मार्च 2023 ते 25 मार्च 2023 या कालवधीत होणार आहे. राज्य शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे.

SSC HSC Exam 2023
दहावी बारावी परीक्षा
जाहिरात

राज्यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 9 विभागीय मंडळाकडून दहावी, बारावीची परीक्षा घेण्यात येणार आहे. लेखी परीक्षेचं संभाव्य वेळापत्रक याआधी सप्टेंबर महिन्यातच प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानतंर वेळापत्रकाबाबत सूचना मागवण्यात आल्या होत्या. यासाठी 15 दिवसांची मुदत दिली गेली होती. वेळापत्रकाबाबत आलेल्या सूचनांनंतर दहावी आणि बारावीचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा आणि अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना कळविण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे.

इतर कोणतंही वेळापत्रक ग्राह्य धरू नये

मंडळाकडून असंही सांगण्यात आलं आहे की, संकेतस्थळावर असलेली वेळापत्रकांची सुविधा ही केवळ माहितीसाठी आहे. परीक्षेआधी शाळा, महाविद्यालयात छापील स्वरुपात देण्यात येणारं वेळापत्रक अंतिम असेल. त्या वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी आणि विद्यार्थ्यांनी परीक्षेला हजर राहावं. व्हॉटसअप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेलं वेळापत्रक ग्राह्य धरू नये. याशिवाय प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा आणि इतर विषयांच्या परीक्षेचं वेळापत्रक स्वतंत्रपणे संबंधित शाळा आणि महाविद्यालयांना कळवण्यात येईल असंही बोर्डाने म्हटलं आहे.

राज्यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळाकडून दहावी व बारावीची परीक्षा घेण्यात येणार आहे. लेखी परीक्षेचं संभाव्य वेळापत्रक याआधी 19 सप्टेंबर 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानतंर वेळापत्रकाबाबत सूचना मागवण्यात आल्या होत्या. यासाठी मंडळाकडून 15 दिवसांची मुदत देण्यात आली होती. वेळापत्रकाबाबत आलेल्या सूचनांनंतर दहावी आणि बारावीचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

दहावी-बारावीच्या परीक्षांचे सविस्तर अंतिम वेळापत्रक मंडळाच्या http://www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकाची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. मंडळाकडून देण्यात आलेल्या छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी,अशी माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here