Sparrow Viral Video: चिमणीनं मांजरांना शिकवला चांगलाच धडा

0

मुंबई,दि.३०: Sparrow Viral Video: चिमणीनं मांजरांना चांगलाच धडा शिकवला आहे. याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मांजर अत्यंत हुशार प्राण्यांपैकी एक म्हणून ओळखली जाते. तिची शिकार करण्याची पद्धत ही बरीचशी वाघासारखीच आहे. शिकार कितीही उंचावर असूदे वा कितीही घनदाट झाडीत लपलेली असू दे मांजर बरोबर हल्ला करून एका झटक्यात फडशा पाडते. पण याच मांजरीला चक्क एका चिमणीनं धडा शिकवला. बरं, ही मांजर एकटी नव्हती. तिच्यासोबत आणखी ४ सदस्य देखील होते. पण चारही मांजरींना एकटी चिमणी पुरून उरली. मांजर आणि चिमणीमध्ये झालेल्या या अनोख्या फायटिंगचा व्हिडीओ तुम्ही देखील एकदा पाहाच.

झालं असं की एक चिमणी दाणे टिपण्यासाठी घराच्या बाल्कनित येऊन बसली. पण तेवढ्यात त्या घरातील चार मांजरींनी तिला घेरलं. या चारही मांजरी शिकार करण्याच्या उद्देशानं तिच्याकडे पाहात होत्या. पण पहिला हल्ला कोण करणार? याबाबत मांजरींमध्ये थोडा वाद होता. अन् याच वादाचा फायदा उचलून त्या चिमणीनं पळ काढला. संधी मिळताच चिमणीनं मांजरीला हुल दिली आणि विरूद्ध दिशेला उडून गेली. हा व्हिडीओ @gunsnrosesgirl3 या ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत ९२ लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहिला असून अनेकांनी चिमणीच्या हुशारीचं कौतुक केलं आहे.

Sparrow Viral Video: चिमणीनं अशी केली लढाई


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here