सोलापूरमध्ये काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्या फोटोला दुग्धाभिषेक

0

सोलापूर,दि.22: भारतीय जनता पार्टीने सोलापूरसह राज्यात वेगळ्या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे काँग्रेस कार्यकर्त्याने पाय धुतले होते, या घटनेच्या विरोधात आंदोलन केले होते. याला प्रत्त्युत्तर देत सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे व जिल्हा संघटक रमेश हसापुरे यांच्या नेतृत्वाखाली चार पुतळा चौकात नाना पटोले यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक करण्यात आला.

काय म्हणाले विजयकुमार हत्तुरे?

या प्रसंगी विजयकुमार हत्तुरे यांनी भाजपच्या नेत्यावर सडकून टीका केली. हत्तुरे म्हणाले, ‘भाजपाने आंदोलन करण्याऐवजी स्वतःचे 23चे 09 खासदार का झाले? यावर आत्मचिंतन करावे. नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली 14 खासदार महाराष्ट्रात निवडून आले. काँग्रेस राज्यात एक नंबरचा पक्ष झाला. परंतु वैफल्यग्रस्त झालेल्या भाजपने उगीचच आंदोलन करून स्वतःचे हसे करून घेतले.’

काय म्हणाले रमेश हसापुरे?

अकोला जिल्ह्यातील वाडेगाव या ठिकाणी संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांची पालखी आली असता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले हे त्या ठिकाणी दर्शन घ्यायला गेले होते. परंतु पावसाने चिखल झाल्याने नाना पटोलेंचे पाय चिखलाने माखल्याने कार्यकर्त्याने पाणी आणून दिले. लोकसभेच्या निवडणुकीत ज्या पद्धतीने नानाभाऊ पटोले यांनी महाराष्ट्रात भाजपचा सुफडा साफ केला त्याच पद्धतीने आता राज्यात सुद्धा महाविकासाघाडीचे सरकार नानाभाऊ आणतील याची भीती भाजपाच्या मनात आहे अशी टीका जिल्हा संघटक रमेश हसापुरे यांनी केली.

यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नामदेव फुलारी, मोतीराम राठोड, एम. एस. मुंडेवाडीकर, अमर पाटील कंदलगाव, समर्थ हिटनळी, काशिनाथ होनराव, रुद्रप्पा कांबळे, नागेश पडनुरे, परशुराम राऊतराव, यशवंत नानाजी, अमिन शेख, नंदू पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here