आमदार प्रणिती शिंदे इतक्या मतांनी आघाडीवर

0

सोलापूर,दि.3: लोकसभा निवडणुकीची सुरू झाली आहे. सोलापूर लोकसभा व माढा लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपाला धक्का बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे या आघाडीवर आहे तर भाजपाचे उमेदवार राम सातपुते हे पिछाडीवर आहेत.

आमदार प्रणिती शिंदे (काँग्रेस) यांना 327327 मते पडली आहेत तर भाजपाचे राम सातपुते यांना 295747 मते पडले आहेत. प्रणिती शिंदे या 31580 मतांनी आघाडीवर आहेत.

यंदा सोलापूरात 59.19 टक्के मतदान झाले आहे. 2019 साली 58.57 टक्के मतदान झाले होते. यंदा हे मतदान 0.62 टक्के मतदान झाले आहे. येथे सोलापूर शहर (उत्तर) मध्ये 59.15 टक्के, सोलापूर शहर (मध्य) मध्ये 56.51 टक्के, अक्कलकोट येथे 59.17 टक्के, सोलापूर (दक्षिण) येथे 58.28 टक्के, पंढरपूर येथे 59.04 टक्के मतदान झाले. या सहा विभानसभा मतदारसंघात एकूण 20 लाख 30 हजार 119 मतदार आहेत. यात 10 लाख 41 हजार 470 पुरूष मतदार आहेत तर, 9 लाख 8 हजार 450 महिला मतदार आहेत तसेच 199 तृतीयपंथी मतदार आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here