Solapur: पंढरपूर माघवारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी जारी केले आदेश

0

सोलापूर, दि.8: Solapur: येत्या 11 फेब्रुवारी 2022 रोजी पंढरपूर येथे माघवारीचा मुख्य दिवस आहे. पंढरपूर शहरात वाहतूकीची कोंडी निर्माण होवू नये म्हणून शहरातील महत्वाच्या रस्त्यावर एकेरी वाहतूक, पार्कींग नियोजन करणे व शहरात प्रवेश करणाऱ्या वाहनांना काही ठिकाणी प्रवेश बंद करणे गरजेचे असल्याने वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आल्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी जारी केले आहेत. हे आदेश 16 फेब्रुवारी 2022 पर्यंत लागू राहणार आहेत. जड वाहतूक पर्यायी मार्गाने करण्यात आली आहे. याचा अवलंब वाहनचालकांनी करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

जारी केलेल्या आदेशात म्हटल्याप्रमाणे प्रवेश व्यवस्था खालीलप्रमाणे

पंढरपूर शहरात प्रवेश करणाऱ्या वाहनांबाबत

नगर, बार्शी, सोलापूर, मोहोळकडून येणारी वाहने अहिल्या चौक, शेटफळ चौकमार्गे मोहोळ रोड विसावा येथे पार्किंग करतील. तसेच 65 एकर येथे फक्त दिंडी व पालखीचे वाहने पार्किंग करतील. पुणे, सातारा, वाखरीमार्गे येणारी वाहने इसबाबी विसावा येथे पार्किंग करतील. कंडरे जीमचे समोरील जागेत व कॉलेज क्रॉस चौकी येथील पाठीमागील मैदानात पार्किंग करतील. कराड, आटपाडी, दिघंचीकडून येणारी वाहने कराड रोड वेअर हाउसमध्ये पार्किंग करतील. कोल्हापूर, सांगली, मिरज, सांगोलाकडून येणारी वाहने ही कासेगांव फाटा, टाकळी बायपास मार्गे वेअर हाउसमध्ये पार्किंग करतील. विजापूर, मंगळवेढामार्गे येणारी वाहने ही कासेगाव फाटा, टाकळी बायपास मार्गे वेअर हाउस आणि यमाई तुकाई मंदिर मैदान येथे पार्किंग करतील.

शहरातून बाहेर जाणाऱ्या वाहतूकीबाबत

टेंभूर्णी, अहमदनगर, सोलापूर, लातूर, बीड, उस्मानाबादकडे जाणाऱ्या सर्व गाड्या सावरकर चौक, नवीन कराड नाका, कॉलेज क्रॉस चौक, कौठाळी बायपास, नविन सोलापूर नाका या मार्गाने जातील. पुणे, साताराकडे जाणाऱ्या सर्व गाड्या सावरकर चौक, नविन कराड नाका, कॉलेज क्रॉस चौक, वाखरी मार्गे जातील. विजापूर, कराड, आटपाडी, कोल्हापूर, सांगली, मिरज, मंगळवेढाकडे जाणा-या सर्व गाडया सावरकर चौक, नवीन कराड नाका, टाकळी बायपास, गादेगाव फाटापासून संबंधीत आपल्या मार्गे जातील.

पंढरपूर शहरातील अंतर्गत वाहतूकीबाबत

प्रदक्षिणा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनास बंद करण्यात येत आहे. महाव्दार चौक ते शिवाजी चौक आणि सावरकर चौक ते शिवाजी चौक हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीसाठी प्रवेश बंद करण्यात येत आहे. बार्शी, सोलापूर या मार्गावरून तीन रस्ता मार्गे येणारी हलकी वाहने फक्त अंबाबाई पंटागणात उतरतील. नियमित ट्रक व यात्रेसाठी सोडण्यात येणा-या एस. टी. बसेस यांना जुना दगडीपूल, नवीन पुल, तीन रस्ता मार्ग बंद ठेवण्यात येत आहे. मंगळवेढा नाका, महात्मा फुले चौक, लहुजी वस्ताद चौक या मार्गाने शहरात सर्व प्रकारचे वाहनास प्रवेश बंद करण्यात येत आहे. अंबाबाई पटांगण ते भजनदास चौक, अंबाबाई पंटागण ते अर्बन बँक, शिवाजी चौक ते अर्बन बँक, संकुल कॉर्नर ते नगरपालिका हा मार्ग पासेसच्या वाहनाव्यतिरीक्त इतर सर्व वाहनास प्रवेश बंद करण्यात येत आहे.

पार्किंग व्यवस्था

अहमदनगर, बार्शी, सोलापूर, मोहोळकडून येणारी सर्व प्रकारची वाहने अहिल्या चौक, तीन रस्ता मार्ग मोहोळ रोड पुणे, विसावा 65 एकरचे पाठीमागील नगरपालिकेच्या पार्कींगमध्ये पार्कींग करतील तसेच 65 एकर येथे फक्त दिंडीची वाहने पार्कंग करतील. पुणे सातारा, वाखरी मार्गे येणारी वाहने इसबावी विसावा येथे तर कराड, आटपाडी, दिघंची मार्गे येणारी वाहने ही वेअर हाउसमध्ये पार्किंग करतील. कोल्हापूर, सांगली, मिरज, सांगोला मार्गे येणारी वाहने ही कासेगांव फाटा, टाकळी मार्गे वेअर हाऊसमध्ये पार्किंग करतील. विजापूर, मंगळवेढामार्गे येणारी वाहने ही कासेगाव फाटा, टाकळी मार्गे वेअर हाऊसमध्ये पार्किंग करतील.

यात्रेच्या कालावधीत पंढरपूर शहरात येणारी हलकी वाहने अंबाबाई पटांगण, गजानन महाराज मठ पार्किंग, नगरपालिका पार्किंग, क्रिडा संकुल येथे व संबंधीत मठामध्ये पार्क होतील. शहरातील अंतर्गत रोडवर कोणत्याही ठिकाणी गाडया पार्किंग होणार नाहीत.

शहराबाहेरुन जाणा-या जड वाहतूकीबाबत

सोलापूर, बार्शी, नगर बाजुकडून नियमीतपणे येवून पंढरपूर मार्गे बाह्यवळण मार्गावरून वेळापूर अकलूज, महूद, सांगोला, मंगळवेढा बाजूकडे जाणारी जड व अवजड वाहने त्यामध्ये ट्रक, डंपर, ट्रॉलीसह ट्रेलर, कंटेनर, टँकर (गॅस टँकर, सार्वजनिक वितरण व्यवस्था, शासकीय अन्न-धान्य वाहतुकीची वाहने, केरोसिन, डिझेल, पेट्रोल व गॅस सिलेंडरची वाहतुक करणारी वाहने, ट्रॅक्टर ट्रॉलीसह व ऊस वाहतुक करणारी वाहने वगळून) या वाहनांना मोहोळ शिवाजी चौक, शेटफळ फाटा, वेणेगाव फाटा, करकंब (खेड भोसे पाटी) येथून पंढरपूर मार्गे जाण्यास प्रवेश बंद करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग

मोहोळ, कामती, मंगळवेढा, सांगोला मार्गे इच्छीत स्थळी किंवा मोहोळ, शेटफळ, टेंभुर्णी, वेळापूर, साळमुख फाटा, महूद, सांगोला मार्ग इच्छीत स्थळी. विजापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, आटपाडी, पुणे बाजूकडून नियमीतपणे येवून पंढरपूर मार्गे बाह्यवळण मार्गावरून टेंभुर्णी, शेटफळ, मोहोळ, मंगळवेढा, सांगोला, बाजुकडे जाणारी जड अवजड वाहने त्यामध्ये ट्रक, डंपर, ट्रॉलीसह ट्रेलर, कंटेनर, टॅँकर (गॅस टँकर सार्वजनिक वितरण व्यवस्था, शासकीय अन्न-धान्य वाहतुकीची वाहने, केरोसिन, डिझेल, पेट्रोल व गॅस सिलेंडरची वाहतुक करणारी वाहने, ट्रॅक्टर ट्रॉलीसह व ऊस वाहतुक करणारी वाहने वगळून) या वाहनांना मोहोळ कुरूल फाटा, मंगळवेढा नाका, सांगोला नाका, महूद फाटा, साळमुख फाटा, श्री. ज्ञानेश्वर चौक वेळापूर येथून पंढरपूर मार्गे जाण्यास प्रवेश बंद करण्यात येत आहे, असेही जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here