Solapur: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूरकरीता महापालिकेचे आयुक्त पी शिवशंकर यांनी काढले आदेश

0

सोलापूर,दि.10: Restrictions In Solapur: महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या (Corona Cases In Maharashtra) वाढत आहे. वाढणाऱ्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात निर्बंध लावण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी घेतला होता. राज्य शासनाच्या आदेशानुसार सोलापूर शहराकरिता सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी शिवशंकर (Municipal Commissioner P Shivshankar) यांनी सुधारित आदेश काढले आहेत. आयुक्त पी शिवशंकर यांनी काढलेले आदेशानुसार आज मध्यरात्रीपासून शहरात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत.

काय आहेत नियम?

रात्री 11 ते सकाळी 5 पर्यंत शहरात सर्वत्र संचारबंदी तर रात्री नाईट कर्फ्यू घोषीत करण्यात आला आहे.

सोलापूर शहरात आता दिवसा जमावबंदी लागू करण्यात आली आहे. दिवसा पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही.

अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडण्यास निर्बंध

सरकारी कार्यालयात भेटणाऱ्यांना निषेध, आवश्यकता असल्यासच मुख्य कार्यालयाची लेखी परवानगी आवश्यक

प्रायव्हेट ऑफिसेसमध्ये वर्क फ्रॉम होम, 50 टक्के पेक्षा अधिक जणांना परवानगी नाही

भाजीपाला / फळ विक्रेते, दुकानदार व आठवडी बाजारमधील विक्रेते यांचे लसीचे दोनही डोस घेतलेले असणे आवश्यक आहे. तसेच दि. 10 ते 14 जानेवारी 2022 पर्यंत चाचणी करुन घेणे बंधनकारक राहील. याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस दि. 15/01/2022 पासून रु.1000 / – इतका दंड करणेत येईल.

लग्न समारंभासाठी 50 जणांना परवानगी

अंत्यविधी आणि अंत्यसंस्कारासाठी 20 जणांना परवानगी

सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमासाठी 50 जणांना परवानगी

15 फेब्रुवारीपर्यंत शाळा आणि कॉलेज बंद

हेअर कटिंगची दुकानं 50 टक्के क्षमतेने सुरू, रात्री 10 ते सकाळी 7 पर्यंत बंद राहणार

पर्यटन स्थळं बंद, पार्क, प्राणी संग्रहालय, फोर्ट, म्युझियम, एन्टरटेन्मेंट पार्क पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहे

शॉपिंग मॉल आणि बाजार कॉम्पलेक्स 50 टक्के क्षमतेने सुरू

रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार. रात्री 10 ते सकाळी 5 हॉटेल बंद राहणार आहे. होम डिलिव्हरी सुरु राहणार आहे

नाट्यगृह, सिनेमागृह 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार आहे. क्षमता बोर्डावर प्रदर्शित करावी.

अम्युझमेंट पार्क, किल्ले आणि स्थानिक पर्यटनस्थळे पूर्णपणे बंद राहतील.

शॉपिंग मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स 50 टक्के क्षमतेने सुरु ठेवता येणार. मॉलमध्ये करोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांनाच परवानगी

हॉटेल्स आणि रेस्टारंटस सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत 50 टक्के क्षमतेने चालवता येणार.

शहरात प्रवेश करायचा असेल, तर कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस किंवा आरटी पीसीआ चाचणीचा निगेटीव्ह रिपोर्ट बंधनकारक

लसीचे दोन्ही डोस न झालेल्या व्यक्ती काम करताना आढळल्यास संबंधित हॉटेल, दुकान किंवा रेस्टॉरंटवर कारवाई होणार


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here