या प्रमुख लढतींकडे संपूर्ण शहराचे लक्ष, कोण ठरणार श्रेष्ठ

0

सोलापूर,दि.१६: सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत गुरुवारी सोलापूर शहरातील विविध प्रभागांमध्ये मतदान शांततेत पार पडले. महापालिकेच्या १०२ जागांसाठी एकुण  ५६४ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. भाजपाने २६ प्रभागात सर्वच जागांवर उमेदवार उभे केले होते. भाजपाचे १०२ जागांवर उमेदवार उभे होते. अनेक प्रभागातील लढतींकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिले आहे. भाजपचे बिज्जू प्रधाने, भाजपचे पद्माकर काळे, शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हा प्रमुख अमोल शिंदे, भाजपाचे गणेश वानकर, भाजपचे नागेश ताकमोगे, राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) वैभव हत्तूरे तसेच आनंद चंदनशिवे हे प्रमुख चेहरे निवडणूक रिंगणात उतरले होते.

प्रभाग क्रमांक ५ ड मध्ये भाजपचे बिज्जू प्रधाने विरूध्द राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) गणेश पुजारी यांच्यात लढत झाली आहे. प्रभाग ६ मध्ये भाजप, शिवसेना शिंदे गट आणि अपक्ष उमेदवारांचा थेट त्रिकोणी सामना रंगला. माजी महापौर मनोहर सपाटे, भाजपचे माजी नगरसेवक गणेश वानकर, सुनील खटके आणि शिंदे गटाचे मनोज शेजवाल हे प्रमुख चेहरे निवडणूक रिंगणात उतरले होते. मतदारांमध्ये निकालाबाबत मोठी उत्सुकता आहे.

प्रमुख लढती

प्रभाग ३ ड – भाजपचे संजय कोळी विरुद्ध शिवसेनेचे (शिंदे गट) सुरेश पाटील.

प्रभाग ४ अ– भाजपच्या वंदना गायकवाड विरुद्ध राष्ट्रवादीच्या (अजित पवार) कविता चंदनशिवे

प्रभाग ४ ब – भाजपचे विनायक विटकर विरुद्ध राष्ट्रवादीचे (अजित पवार) सुशील बंदपट्टे

प्रभाग ५ अ – राष्ट्रवादीचे (अजित पवार) आनंद चंदनशिवे विरुद्ध भाजपचे समाधान आवळे

प्रभाग ५ ड – भाजपचे बिज्जू प्रधाने विरुद्ध राष्ट्रवादी (अजित पवार) चे गणेश पुजारी

प्रभाग ६ ड – भाजपचे गणेश वानकर विरुद्ध शिंदेसेनेचे मनोज शेजवाल

प्रभाग ७ क – भाजपच्या उत्तरा बचुटे- बरडे विरुद्ध शिंदेसेनेच्या मनोरमा सपाटे.

प्रभाग ७ ड – भाजपचे पद्माकर काळे विरुद्ध शिवसेनेचे (शिंदे गट) अमोल शिंदे

प्रभाग २२ ड – भाजपचे किसन जाधव विरुद्ध राष्ट्रवादीचे (अजित पवार) जुबेर शेख, अपक्ष शीतल गायकवाड.

प्रभाग २५ ब – भाजपचे नागेश ताकमोगे विरुद्ध राष्ट्रवादीचे (अजित पवार) वैभव हत्तुरे


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here