सोलापूर,दि.15: Solapur-Mumbai Flight: सोलापूर-मुंबई विमानसेवा लवकरच सुरू होणार आहे. सोलापूर-गोवा विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळत असून आता सोलापूर-मुंबई विमानसेवा 15 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. (Solapur-Mumbai Flight Service Will Start From August 15)
सोलापूर-गोवा विमानसेवेला (Solapur-Goa Flight) 9 जून रोजी प्रारंभ झाला. गेल्या महिनाभरात एक दिवस वगळता ही विमानसेवा सुरु असून आतापर्यंत 1100 हून अधिक प्रवाशांनी या विमानसेवेचा लाभ घेतला आहे.

केंद्रीय नागरी विमान उडायन मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मुंबईसाठीही लवकरच विमानसेवा सुरु होईल, असे जाहीर केल्यानंतर 1 ऑगस्टपासून विमान सेवा सुरू होईल असे सांगण्यात आले होते मात्र अजूनही तिकीट बुकींग प्रक्रीया सुरु झाली नाही.
त्यामुळे एक ऑगस्टज्ञऐवजी 15 ऑगस्ट पासून स्टार एअरलाईन (Star Airlines) ही कंपनी विमानसेवा सुरु करणार आहे. सोलापूर मुंबईसाठी दुपारी दिड ते अडीच यावेळेत टेकऑफ आणि लँडींगसाठी 4 ते 6 मिनिटांचा स्लॉट मिळण्याची शक्यता आहे.