सोलापूर,दि.२२: Solapur | सोलापूरसह राज्यातील २९ महापालिकेतील महापौर पदाचे आरक्षण सोडत आज जाहीर करण्यात आली. सोलापूर महानगरपालिका करिता खुला प्रवर्गाचा (Open) महापौर होणार आहे. महापौर पदासाठी डॅा. किरण देशमुख यांचे नाव आघाडीवर राहील अशी शक्यता आहे. लातूर महापालिका एससी (SC) महिला प्रवर्गासाठी राखीव तर ठाणे महापालिका एससी (SC) प्रवर्गासाठी राखीव तर कल्याण-डोबिंवली एसटी (ST) प्रवर्गासाठी राखीव.
सोलापूर, पुणे, पिंपरी चिंचवड, सांगली, नाशिक, धुळे, मालेगाव या महापालिकांवर सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण सोडत निघाली. या पालिकांवर ओपन प्रवर्गातील नगरसेवक महापौर होणार आहे.
पनवेल महापालिका, इचलकरंजी महापालिका, कोल्हापूर महापालिका, अहिल्यानगर ओबीसी (OBC) प्रवर्गासाठी तर जळगाव आणि चंद्रपूर महापालिका ओबीसी महिला (OBC) प्रवर्गासाठी सोडत जाहीर झाली आहे. यामुळे या महापालिकेत ओबीसी महापौर होणार आहे.
महापालिका निवडणूक निकालानंतर प्रतिक्षा असलेल्या महापौर पदाचे आरक्षण येत्या आज जाहीर झाले असून सोलापूरच्या ३८ व्या महापौरासाठीची स्पर्धा अधिक तीव्र होणार आहे.
सोडत चक्राकार पद्धतीने (रोटेशनल/सर्क्युलर पद्धत) काढण्यात आली आहे. समाजातील सर्व घटकांना महापौर पदाची संधी मिळावी यासाठी चक्राकार पद्धतीने आरक्षणाची सोडत काढण्यात येते. महापौर पदासाठी आरक्षण निश्चित झालं असून आरक्षण जाहीर झाल्यानंतर विविध महानगरपालिकांमध्ये महापौर निवडीची प्रक्रिया आता सुरू करण्यात आली.
राज्यातील 29 महानगरपालिकांपैकी एकूण 15 महापालिकांमध्ये महिला महापौर विराजमान होतील. 50 टक्के महिला आरक्षणाच्या नियमानुसार या जागांची विभागणी करण्यात आली असून. या सोडतीनुसार अहिल्यानगर, जळगाव, अकोला आणि चंद्रपूर या चार शहरांमध्ये ओबीसी महिला महापौर असतील.








