महापौर पदाचे आरक्षण आज निघणार, कोण होणार महापौर ठरणार 

0
विनायक कोंड्याल आणि डॅा. किरण देशमुख

सोलापूर,दि.२२: सोलापूरसह राज्यातील २९ महापालिकेतील महापौर पदाचे आरक्षण आज निघणार आहे. या सोडतीवरूनच कोण होणार महापौर हे ठरणार आहे. कोणत्या शहरात महिला महापौर असेल, जी ओबीसी, सामान्य प्रवर्गातील किंवा अनुसूचित जाती प्रवर्गातील असेल? या प्रकरणावरील पडदा गुरुवारी सकाळी ११ वाजता उचलला जाईल, कारण नगरविकास विभाग आरक्षण प्रक्रियेद्वारे हे ठरवेल.  

महापालिका निवडणूक निकालानंतर प्रतिक्षा असलेल्या महापौर पदाचे आरक्षण येत्या आज जाहीर होणार असून सोलापूरच्या ३८ व्या महापौरासाठीची स्पर्धा अधिक तीव्र होणार आहे. महापौर आरक्षण ओबीसी, सामान्य प्रवर्गातील किंवा अनुसूचित जाती प्रवर्गातील असेल? यावरून सोलापूर महानगरपालिकेचा महापौर कोण असेल हे स्पष्ट होईल. 

सर्व महानगरपालिकांमध्ये, नवीन महापौरांची निवड महानगरपालिकेच्या सभागृहातील नगरसेवकांच्या मतदानाद्वारे केली जाईल. काही शहरांमध्ये नवनिर्वाचित नगरसेवकांच्या विशेष बैठकींमध्ये महापौरांची निवड केली जाईल, परंतु त्यापूर्वी, एकनाथ शिंदे यांच्या मंत्रालयाकडून लॉटरी पद्धतीने महापौरांचे आरक्षण वर्ग निश्चित केला जाईल. 

सोलापूर महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. एकुण १०२ जागांपैकी ८७ जागा भाजपाने जिंकल्या असून याच पक्षाचा महापौर निवडून येणार आहे. या पदासाठी अनेक नावांची चर्चा असली तरी आरक्षण कोणते पडणार यावरच उमेदवार ठरवला जाईल.

सोलापूर महापालिका महापौर पदासाठी विनायक कोंड्याल, डॉ. किरण देशमुख, रंजीता चाकोते, प्रथमेश कोठे, यांची नावे चर्चेत आहेत. कोंड्याल हे चौथ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. तर डॅा. किरण देशमुख हे दुसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here