आमदार प्रणिती शिंदे आघाडीवर तर राम सातपुते पिछाडीवर

0

सोलापूर,दि.4: सोलापूर लोकसभा मतदार संघात मंगळवारी (दि.7 मे) मतदान झाले. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे आणि भाजपाचे आमदार राम सातपुते यांच्यात लढत झाली आहे. आमदार प्रणिती शिंदे या आघाडीवर आहेत तर राम सातपुते हे पिछाडीवर आहेत. दहाव्या फेरी अखेर प्रणिती शिंदे हे आघाडीवर आहेत.

आमदार प्रणिती शिंदे (काँग्रेस) यांना 2,70,650 मते पडली आहेत तर भाजपाचे राम सातपुते यांना
2,59,945 मते पडले आहेत. प्रणिती शिंदे या 10,705 मतांनी आघाडीवर आहेत.

सोलापूर लोकसभा मतदार संघात 59.19 टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे. सोलापूर लोकसभा मतदार संघात एकुण 2030119 मतदार आहेत. यात पुरूष मतदारांची संख्या 1041470 आहे, तर महिला मतदारांची संख्या 988450 आहे.

सोलापूर लोकसभा मतदार संघात 1201586 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात 645015 पुरूषांनी तर 556515 महिलांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. पुरूषांची टक्केवारी 61.93 तर महिलांची 56.30 टक्के आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here