सोलापूर,दि.२१: Solapur Crime: दि. १८/०२/२०२२ रोजी सायं. ०५.०० वा. च्या सुमारास महिला नामे अंबिका उर्फ रेश्मा महंमद कुरेशी रा. सोलापूर महानगरपालीका वसाहत, सिध्दार्थ चौक, सोलापूर ही घरी बसली असताना एक अंदाजे ३५ वर्षे वयाची बुटकी, नकटे नाक असलेली अंगावर व कानात दागिने घातलेली महिला अंबिका उर्फ रेश्मा हिच्याकडे येवून, तू आंधळी आहेस, कांही लोक अंध लोकांना विजापूर वेस येथे अन्नधान्य वाटप करत आहोत. तु तुझ्या मुलाल घेवून ये असे म्हटल्यानंतर अंबिका उर्फ रेश्मा ही तिचा लहान मुलगा नामे रमजान उर्फ बाबा ( वय ०३ वर्षे ) यास सोबत घेवून गेली. तेथून सदर महिलेने तिस विजापूर वेस येथे वडापाव खायला दिला, ती वडापाव खात असतानाच तिला तेथेच सोडून अन्नधान्य वाटपाचे काय झाले ते पाहुन येते असे अंबिका उर्फ रेश्मा हिला सांगुन तिचा ०३ वर्षाचा मुलास ती अंध आहे याचा फायदा घेवून घेवून गेली. त्याबाबत रेश्माचा भाऊ परमेश्वर यल्लप्पा मंदल्लू याने सदर बझार पोलीस ठाणे येथे दि. १९ / ०२ / २०२२ रोजी भादंवि कलम ३६३ प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे.
सदर गुन्हयाचे तपासाचे अनुषंगाने मा . वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांचे मार्गदर्शनाखाली सदर बझार पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अंमलदार यांनी सदर अपहरण करणारी महिला हिचे नाव, गाव पत्ता, फोन नंबर वगैरे बाबत कुठलीही माहिती नसतानाही कोशल्याने व २४ तास सतत अविरतपणे सदर बालकाचा शोध घेवून सर्व संभाव्य ठिकाणी आरोपी स्त्री हिचा शोध घेवून तिला ताब्यात घेतले व तिच्याकडून सदर बालकाला उषा नगर, भाग -३ येथील पत्र्याच्या शेडमध्ये लपवलेले असलेले ताब्यात घेतले आहे . तसेच महिला नामे यास्मीन महेबुब बागवान, वय ३५ वर्षे, रा. गोंधळे वस्ती, गांधी नगर, सोलापूर हिस दि. २१/०२/२०२२ रोजी ताब्यात घेवून तिच्याकडे अपहृत बालकाबाबत विचारपूस करून तिच्या राहते घरातून सदर बालकास सुस्थितीत ताब्यात घेवून त्यास तिची आई अंबिका उर्फ रेश्मा मोहमद कुरेशी हिच्या ताब्यात दिलेला आहे. सदरचा गुन्हा दाखल झाल्यापासुन आरोपीस ताब्यात घेवून अपहृत बालकाची तिच्या तावडीतून सुटका करून उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त सोलापूर हरिश बैजल, पोलीस उप आयुक्त सोलापूर परिमंडळ डॉ. वैशाली कडुकर, सहाय्यक पोलीस आयुक्त सोलापूर विभाग २ माधव रेड्डी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले, पोलीस निरीक्षक गुन्हे पोपटराव धायतोंडे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी सपोनि एन. बी. सावंत, पोहेकॉ नदाफ, पोना सागर सरतापे, पोकॉ रामा भिंगारे, अब्रार दिंडोरे, बाबासो भोसले यांनी केली आहे.