सोलापूर,दि.13 : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत सोलापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. सोलापूर जिल्ह्यात कोरोना (Covid-19) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मध्यंतरी कमी होत असलेली रुग्ण संख्या पुन्हा वाढत आहे. सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 154 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 175920 झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 171671 झाली आहे.
तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 572 आहे.
तर आजपर्यंत मृतांची संख्या 3677 झाली आहे. यात 2389 पुरुष व 1288 महिलांचा समावेश आहे.
सोलापूर जिल्हा ग्रामीण आज 1062 अहवाल प्राप्त झाले. यात 908 निगेटिव्ह तर 154 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात 103 पुरुष आणि 51 महिलांचा समावेश आहे. आज एकही जणांची नोंद मृत म्हणून नाही. तर 44 जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.