सोलापूर,दि.२४ : सोलापूर शहरात रुग्णांची घट होत आहे. शहरात चाचण्या कमी होत आहेत. सोलापूर शहर नवीन ५ रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या २९३८६ झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या २७९०१ झाली आहे.
तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या ३६ आहे.
तर आजपर्यंत मृतांची संख्या १४४९ झाली आहे. यात ९२८ पुरुष व ५२१ महिलांचा समावेश आहे.
सोलापूर शहर आज ७४२ अहवाल प्राप्त झाले. यात ७३७ निगेटिव्ह तर ५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात २ पुरुष आणि ३ महिलांचा समावेश आहे. आज एकही जणांची नोंद मृत म्हणून नाही. तर २ जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.