सोलापूर शहर व जिल्हा ग्रामीण 777 जणांनी केली कोरोनावर मात

0

सोलापूर,दि.29: सोलापूर शहर व जिल्हा ग्रामीण कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे. चाचण्यांच्या संख्येच्या प्रमाणात पॉझिटिव्हिटी दर जास्त आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यातील अनेकांचे लसीकरण झाले आहे. लसीकरण झाल्याने नुकसान कमी होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांचा मृत्यू झाला होता. केंद्र सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 15-18 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू केले आहे.

सोलापूर जिल्हा ग्रामीण 2253 अहवाल प्राप्त झाले, यात 1776 निगेटिव्ह तर 477 पॉझिटिव्ह निघाले आहेत. यात 273 पुरुष व 204 महिलांचा समावेश आहे. एक जणांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हा ग्रामीण ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 2788 आहे. आज बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 674 आहे. सोलापूर जिल्हा ग्रामीण आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या 183096 झाली आहे. तर यापैकी 176611 जणांनी कोरोनावर मात केली आहे तर 3697 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 2402 पुरुष व 1295 महिलांचा समावेश आहे.

सोलापूर शहर 834 अहवाल प्राप्त झाले. यात 757 निगेटिव्ह तर 77 पॉझिटिव्ह निघाले आहेत. यात 40 पुरुष व 37 महिलांचा समावेश आहे. एक जणांची नोंद मृत्यू झाली आहे. सोलापूर शहर ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 2218 आहे. काल बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 103 आहे. सोलापूर शहर आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या 32825 झाली आहे. तर यापैकी 29122 जणांनी कोरोनावर मात केली आहे तर 1485 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 947 पुरुष व 538 महिलांचा समावेश आहे.

सोलापूर जिल्हा ग्रामीण कोरोना अहवाल
सोलापूर जिल्हा ग्रामीण कोरोना अहवाल
सोलापूर जिल्हा ग्रामीण कोरोना अहवाल
सोलापूर शहर कोरोना अहवाल
सोलापूर शहर कोरोना अहवाल


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here