Solapur: बिज्जू प्रधाने यांनी दिला सोलापूर भाजपा सरचिटणीस पदाचा राजीनामा

0

सोलापूर,दि.18: सोलापूर (Solapur) शहर भारतीय जनता (BJP) पार्टीचे सरचिटणीस बिज्जू प्रधाने (Bijju Pradhane) यांनी राजीनामा दिला आहे. बिज्जू प्रधाने यांनी भाजपा शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांना पत्र लिहून राजीनामा दिला आहे. प्रधाने यांनी लिहिलेल्या पत्रात आपण भारतीय जनता पार्टी प्राथमिक सदस्यत्वाचा व सरचिटणीस पदाचा राजीनामा देत आहोत असे लिहिले आहे.

बिज्जू प्रधाने हे माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांचे कट्टर समर्थक आहेत. मात्र पक्षात त्यांची अवहेलना होत होती असे कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. बिज्जू प्रधाने यांना मुद्दाम डावलले जात आहे अशी धारणा कार्यकर्त्यांची झाली होती. मागील महापालिका निवडणुकीत त्यांना त्यांचा वार्ड सोडून दुसरीकडे तिकीट देण्यात आले होते. यात बिज्जू प्रधाने यांचा थोडक्यात पराभव झाला. पक्षातील लोकांनीच दगा दिल्यामुळे बिज्जू प्रधाने यांचा पराभव झाला.

कार्यकर्त्यांची मोठी फळी असलेले बिज्जू प्रधाने हे सामाजिक कार्यातही अग्रेसर आहेत. त्यांचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत चालल्याने पक्षातूनच त्यांचे खच्चीकरण सुरू होते असे अनेक कार्यकर्त्यांनी सांगितले. ज्यांचे ते कट्टर समर्थक होते त्यांनीच बिज्जू प्रधाने यांचे खच्चीकरण करण्यास सुरुवात केली होती असे अनेकांचे म्हणणे आहे. ज्यांच्याकडे दोन कार्यकर्ते गोळा करण्याची योग्यता नाही अशा लोकांच्या हातात पक्षाची धुरा देण्यात आल्याचेही बोलले जात आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here