Solapur Barshi Pangri Fire: सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट

Barshi Pangri Fire News: शोभेच्या दारू कारखान्यात नववर्षाच्या पहिल्या दिवशी मोठा स्फोट झाला

0

सोलापूर,दि.1: Solapur Barshi Pangri Fire: सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात मोठी दुर्घटना घडली आहे. (Solapur Barshi Pangri Fire News) जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील शिराळे-पांगरी हद्दीत असलेल्या शोभेच्या दारू कारखान्यात नववर्षाच्या पहिल्या दिवशी मोठा स्फोट झाला. या स्फोटात प्राथमिक माहितीनुसार पाच जण मयत झाले असून 20 ते 25 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या अपघातात मयताचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली आहे.

अचानक स्फोट झाला | Solapur Barshi Pangri Fire News

बार्शी तालुक्यातील शिराळे-पांगरी हद्दीत शोभेच्या दारूचा कारखाना आहे. याठिकाणी फटाके, दारूगोळे तयार करण्यात येतात. याठिकाणी रविवार 1 जानेवारी 2023 रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अचानक स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज एवढा मोठा होता की, किमान पाच ते दहा किलोमीटर अंतरापर्यंत या स्फोटाचा आवाज ऐकू आल्याचे सांगण्यात आले.

मृतांची संख्या वाढण्याची शक्यता | Barshi Pangri Fire News

बार्शीतील अग्निशामक यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून पोलिसांची टीमही दाखल झाली आहे. जखमींना उपचारासाठी रूग्णालयात नेण्यात येत आहे. मोठया प्रमाणात आग लागल्याने मयताची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. कारखान्यातून आगीचे लोट मोठ्या प्रमाणात येत असल्याने बचावकार्यास अडचणी निर्माण येत आहेत. दुपारी 4 पर्यंत 4 मृतदेह कारखान्यातून बाहेर काढण्यात आले होते तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जाहिरात

बार्शीमध्ये मिनियार नामक व्यक्तीच्या 4 एकर ब्रेकर क्षेत्रावर फटाक्यांची फॅक्टरी आहे. या फटाका फॅक्टरीमध्ये बांगरवाडी, वालवड, उकडगाव या भागातले कामगार काम करत होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here