Solapur AirPort: सोलापूर विमानतळ होणार आता बिझी विमानतळ

0
Solapur AirPort: सोलापूर विमानतळ होणार आता बिझी विमानतळ

सोलापूर,दि.8: प्रथम सोलापूर-गोवा विमानसेवा सुरू करण्यात आली. त्यानंतर सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरू करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोलापूर-गोवा विमानसेवेचा शुभारंभ सोमवार ९ जून रोजी सकाळी करण्यात आली. पहिल्या विमानात बसणाऱ्या पाच प्रवाशांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी बोर्डिंग पास दिले. या शुभारंभ कार्यक्रमासाठी सुमारे दीड हजार जणांना आमंत्रित करण्यात आले होते.

सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरु करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. सोलापूरकरांची मागणी 15 अॅाक्टोंबरला पूर्ण झाली आहे. सोलापूर-मुंबई विमानसेवेचे उद्घाटन दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते करण्यात आले होते. या वेळी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, पालकमंत्री जयकुमार गोरे, स्टार एअर ग्रुपचे अध्यक्ष संजय घोडावत यांची उपस्थिती होती. 

सोलापूर विमानतळ होणार आता बिझी विमानतळ

सोलापूर विमानतळ आता बिझी विमानतळ होणार आहे. सोलापूर विमानतळाची व्याप्ती वाढणार आहेत. आता सोलापूरहून दर रविवारी बंगळुरुसाठी विमानसेवा सुरू होणार आहे.. 16 नोव्हेंबरपासून ही सेवा सुरु होणार आहे. तर सोलापूर-मुंबई-बेळगांव विमानसेवा नियमित सुरु होणार आहे. सोलापूर-तिरुपती विमानसेवाही सुरु करावी अशी मागणी होत आहे, सोलापूर-तिरुपती विमानसेवाही लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here